• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Speed Up The Chiplun Karad Railway Line Demand To Cm Devendra Fadnavis

चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा प्रकल्प मानला जातो. हा मार्ग पूर्ण झाल्यास चिपळूण, खेड, दापोली, गुहागर तसेच कराड, पाटण, कोयना आणि उंब्रज या भागांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2026 | 01:05 PM
चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चिपळूण : राज्यातील विविध रेल्वे जोड प्रकल्पांना निधीची तरतूद करून गती दिली जात असताना सुमारे १०० किलोमीटर लांबीचा चिपळूण-कराड रेल्वे मार्ग अद्याप प्रलंबित असल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती, कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी या प्रकल्पाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. हा मार्ग पूर्ण झाल्यास चिपळूण, खेड, दापोली, गुहागर तसेच कराड, पाटण, कोयना आणि उंब्रज या भागांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. सध्या या भागांदरम्यान थेट रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो.

या मागणीसाठी मुकादम यांनी विविध लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला आहे. त्यांनी मंत्री शंभूराज देसाई, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, आमदार शेखर निकम यांनीही अधिवेशनात चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या प्रलंबित कामाचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे.

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

मुकादम म्हणाले, या रेल्वे मार्गामुळे पर्यटन, कृषी उत्पन्न, वाहतूक, लघुउद्योग तसेच मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. कोकणातील आंबा, काजू, मत्स्यउद्योग यांसारख्या उत्पादनांना पश्चिम महाराष्ट्रात आणि पुढे देशभर जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. तसेच बांधकाम प्रक्रियेदरम्यान आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

व्यापक लोकआंदोलन छेडण्याचा इशारा

कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील अंतर कमी करणारा हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा पुढील काळात व्यापक लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही काही स्थानिक संघटनांनी दिला आहे. राज्यातील इतर प्रकल्पांप्रमाणे या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पालाही प्राधान्य द्यावे, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Speed up the chiplun karad railway line demand to cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Train Journey

संबंधित बातम्या

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल   भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले
1

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले

होळीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार, प्रवाशांना फायदा होणार…
2

होळीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार, प्रवाशांना फायदा होणार…

Vande Bharat Sleeper Quota Update: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; अमृत भारत, वंदे भारतमध्ये आपत्कालीन कोट्यातून मिळेल तिकीट
3

Vande Bharat Sleeper Quota Update: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; अमृत भारत, वंदे भारतमध्ये आपत्कालीन कोट्यातून मिळेल तिकीट

नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय
4

नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

Feb 14, 2026 | 02:40 PM
Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Feb 14, 2026 | 02:38 PM
Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

Feb 14, 2026 | 02:37 PM
पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

Feb 14, 2026 | 02:33 PM
Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Feb 14, 2026 | 02:31 PM
IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

Feb 14, 2026 | 02:24 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Feb 14, 2026 | 02:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.