वऱ्हाडींना मागवले स्वीगीकडून जेवण; 'या' जोडप्याच्या लग्नातील पाहुणचाराची सर्वदूर चर्चा!
ऑनलाईन फूड डिलीवरी कंपनी म्हणून झोमॅटो आणि स्वीगीने अलीकडे चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. ग्राहक म्हणून नागरिक देखील घरी जेवण तयार करायचा मूड नसेल तर अगदी सहजपणे झोमॅटो आणि स्वीगीकडे एका दिवसाच्या जेवणसासाठी ऑर्डर जेवण करतात. मात्र, आता एखाद्या व्यक्तीने थेट स्वीगी या कंपनीलाच आपल्या लग्न समारंभातील जेवणासाठी ऑर्डर दिल्याने, त्याची सर्वदूर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिल्लीतील जोडप्याची लग्नाची सर्वदूर चर्चा
तुम्हालाही ऐकून नवल वाटले असेल की एखादी व्यक्ती लग्न समारंभासारख्या एक मोठ्या कार्यक्रमासाठी स्वीगी सारख्या कंपनीकडून जेवण कसे मागवू शकतो? मात्र, हे अगदी खरे असून, राजधानी दिल्ली येथील एका जोडप्याने आपल्या लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या वऱ्हाडींच्या जेवणाच्या व्यवस्था स्वीगी या ऑनलाईन फूड डिलीवरी कंपनीकडून केली आहे.
हेही वाचा : इंडिगोच्या फ्लाइट तिकिटांवर 18 टक्के सूट; … ‘बिझनेस क्लास’ सीटची सुविधाही सुरू होणार!
‘एक्स’ युजरकडून माहिती शेअर
सर्वसाधारणपणे लोक लग्न किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी हलवाई किंवा केटरर्सला संपूर्ण जेवणाची ऑर्डर देतात. मात्र, दिल्लीतील एका जोडप्याने आपल्या लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी स्वीगीकडून जेवण ऑर्डर केले. मग काय लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला. दिल्लीतील या लग्नातील अनोख्या पाहुणचाराबाबत सुश्मिता नावाच्या एका ‘एक्स’ युजरने फोटो शेअर करत माहिती दिली आहे. ज्यामुळे सध्या या लग्न समारंभाची सर्वदूर चर्चा होत आहे.
They ordered food online for an engagement ceremony?? Bhai I have seen everything 😭😭 pic.twitter.com/v4szxFg4pM
— Susmita (@shhuushhh_) August 4, 2024
अनेक युजर्सकडून रिअॅक्शन
उपलब्ध माहितीच्या आधारे दिल्लीतील एका जोडप्याने आपल्या लग्न समारंभाची ऑर्डर एखादा हलवाई किंवा केटरर्सला देण्याऐवजी स्वीगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीला जेवणाची ऑर्डर देणे उचित समजले. विशेष म्हणजे ही संकल्पना पाहुण्यांच्या देखील चांगलीच पसंती उतरली. मात्र, आता समाजमाध्यमांवर याबाबत माहिती प्रसारित झाल्यानंतर अनेक युजर त्यावर रिअॅक्शन देत आहे.
कंपनीने मारला ‘मौके पे चौका’
विशेष म्हणजे सुश्मिता नावाच्या ‘एक्स’ युजरची पोस्ट पाहिल्यानंतर स्वीगीने देखील आपल्या अधिकृत हॅन्डलवरून संबंधित लग्न संभारभातील ऑर्डरचा फोटो शेअर केला आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या आजपर्यंतच्या क्रेझी डील्सचा वापर या जोडप्याशिवाय अन्य कोणी केला नसेल. या जोडप्याने कंपनीला लग्न समारंभाच्या जेवणाची ऑर्डर कंपनीला दिली. तसेच कंपनी मोठ्या ऑर्डर घेण्यासाठी देखील सक्षम असल्याचे कंपनीने म्हटले आहे.