Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paytm Payments Bank: Paytm ला हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका! पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याचे आदेश; युजर्सचे काय होणार?

Paytm आणि तिच्या पेमेंट्स बँकेला उच्च न्यायालयाकडून एक मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळत पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच नियमांच्या उल्लंघनामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांवर कडक निर्बंध लादले होते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 07:14 PM
(फोटो सौजन्य: chatgpt)

(फोटो सौजन्य: chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • Paytm ला हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका!
  • पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याचे आदेश
  • युजर्सवर काय परिणाम होणार?
High Court Order On Paytm: जर तुम्ही Paytm युजर्स आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण हायकोर्टाने Paytm बाबत बराच मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड बंद करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँके म्हणजे RBI ने मंगळवारी स्पष्ट केलं की, नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे बँकेचा परवाना आधीच रद्द करण्यात आला होता आणि हा आदेश बँक बंद करण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे. RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली उच्च न्यायालयाने ८ जुलै आणि २२ जुलै २०२६ रोजीच्या आदेशांद्वारे, बँकिंग नियमन कायदा, १९४९ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदींनुसार पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पण या सगळ्या निर्णयानंतर संपूर्ण प्रकरण काय आहे? सविस्तर समजून घेऊयात.

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! युरियाची टंचाई आता कायमची संपणार! ‘या’ नवीन खताला मिळाली मंजुरी

SBI ने अधिकृत लिक्विडेटरची नियुक्ती केली

न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक गिरीकुमार एम. नायर यांची Paytm पेमेंट्स बँकेचे अधिकृत लिक्विडेटर म्हणून नियुक्ती केली आहे. RBI ने म्हटले आहे की, त्यांना बँकिंग नियमन कायदा आणि कंपनी कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. केंद्रीय बँकेनुसार, अधिकृत लिक्विडेटर ८ जुलै २०२६ पासून बँकेच्या संचालक मंडळाचे सर्व अधिकार वापरतील आणि बँकेच्या कामकाजाशी व दिवाळखोरीशी संबंधित सर्व निर्णय आता त्यांच्या देखरेखीखाली घेतले जातील.

कारवाई करण्यासाठी दिल्ली हायकोर्टात मागणार दाद

एप्रिल २०२६ मध्ये RBI ने Paytm पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर हा आदेश आला आहे. त्यावेळी, मध्यवर्ती बँकेने म्हटले होते की, बँक नियामक नियमांचे पालन करण्यात सातत्याने अपयशी ठरली होती आणि तिचे कामकाज ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक असल्याचे आढळले होते. RBI ने बँक बंद करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याकरिता दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही जाहीर केले होते. आता, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, Paytm पेमेंट्स बँकेच्या दिवाळखोरीची प्रक्रिया औपचारिकपणे पुढे जाईल.

Paytm शेअर प्राईज

पेटीएमची शेयर मार्केटमधील लिस्टेड पॅरेंट कंपनी, One 97 Communications चा आज १.४३% च्या वाढीसह ₹१,३०८ वर बंद झाली. या कालावधीत कंपनीचे मार्केट कॅपिटल ₹८३,८१५ कोटी इतकं होतं.

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?

Web Title: High court big blow to paytm orders to shut down paytm payments bank marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Paytm
  • paytm app
  • Paytm IPO
  • RBI
  • RBI Action
  • RBI governor
  • RBI jobs
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष
1

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर
2

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा
3

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?
4

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.