Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Income Tax Saving: तुमची कारही वाचवू शकते टॅक्स! फार कमी लोकांना माहिती आहे पैसे वाचवण्याचं ‘हे’ सिक्रेट

कार लोन घेणाऱ्या बहुतांश व्यक्तींना याची कल्पना नसते की, कर्जाचा हा प्रकार त्यांना कर बचतीमध्येही मदत करू शकतो. जरी कार कर्जाशी संबंधित कर लाभ हे गृह कर्जाच्या तुलनेत तितकेसे सरळ नसले, तरी Tax Liability बरीच कमी करु शकते

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 10, 2026 | 12:57 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुमची कारही वाचवू शकते टॅक्स!
  • कार लोनवरील टॅक्स केव्हा मिळतो?
  • कोणाला मिळणार टॅक्सवर सूट?
Car Loan Tax Benefit : आजकाल भारतात कार कर्ज घेणे ही एक अत्यंत सामान्य बाब बनली आहे. बँका वाहनांसाठी फायनान्स सहजपणे उपलब्ध करून देतात आणि नेमक्या याच कारणामुळे कार कर्जांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. पण कार लोन घेणाऱ्या बहुतांश व्यक्तींना याची कल्पना नसते की, कर्जाचा हा प्रकार त्यांना कर बचतीमध्येही मदत करू शकतो. जरी कार कर्जाशी संबंधित कर लाभ हे गृह कर्जाच्या तुलनेत तितकेसे सरळ किंवा स्पष्ट नसले, तरी विशिष्ट अटींच्या अधीन राहून, ते तुमची Tax Liability बरीच कमी करु शकते. ते कसं काय ? सविस्तर समजून घेऊयात.

Post Office RD Scheme: रोज फक्त 333 रुपयांची सेव्हिंग आणि मिळतील 1700000… पोस्टऑफिसच्या या तगड्या स्कीमबाबत जाणून घ्या

कार लोनवरील टॅक्स केव्हा मिळतो?

कार लोनवरील टॅक्स सवलती केवळ काही ठराविक व्यक्तींच्या गटालाच उपलब्ध असतात. तुम्ही कर सवलतीसाठी पात्र आहात की नाही, हे पूर्णपणे तुम्ही कोणत्या उद्देशाने कार खरेदी करत आहात, यावर अवलंबून असते. भारतात, वैयक्तिक वापरासाठी कार खरेदी करण्याकरिता घेतलेल्या कर्जावर कोणतेही कर लाभ मिळत नाहीत. भारतात कार लोनवरील टॅक्स लाभ केवळ तेव्हाच दिले जातात, जेव्हा त्या वाहनाचा वापर व्यावसायिक उद्देशांसाठी केला जातो.

कोणाला मिळणार टॅक्सवर सूट?

‘Live Mint’ च्या एका अहवालानुसार, कार लोनवरील कर सवलती या जुन्या आणि नवीन अशा दोन्ही कर प्रणालींतर्गत उपलब्ध आहेत.
स्वयंरोजगार करणारे व्यक्ती आणि व्यावसायिक: जर तुम्ही फ्रीलान्सर, डॉक्टर, वकील किंवा व्यावसायिक असाल, तर तुम्ही या कारला ‘Business Asset म्हणून वर्गीकृत करू शकता.
पगारदार कर्मचारी: सामान्यतः, पगारदार व्यक्तींना हा लाभ मिळत नाही; कारण जर त्यांनी हे सिद्ध केले की या कारचा वापर केवळ आणि केवळ व्यावसायिक कारणांसाठीच केला जात आहे, तर ते देखील या कर सवलतीचा दावा करू शकतात.

व्यावसायिक वापराशी संबंधित कर सवलत

लोक अनेकदा आपल्या कारचा वापर कार्यालयीन आणि वैयक्तिक अशा दोन्ही कामांसाठी करतात. अशा प्रसंगी, आयकर विभाग केवळ व्यावसायिक वापराशी संबंधित असलेल्या भागावरच कर सवलतींना मान्यता देतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या कारचा वापर व्यावसायिक कामांसाठी ६०% होत असेल, तर तुम्ही संबंधित खर्च आणि व्याजाच्या केवळ ६०% भागावरच कर सवलतीचा दावा करू शकता. असे करण्यासाठी, लॉगबुक्स, इंधनाची बिले आणि देखभालीच्या पावत्या यांची अचूक नोंद ठेवणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला याचा लाभा मिळू शकतो.

कर सवलतींचा लाभ कसा घ्यायचा?

जर तुमची कार ‘व्यावसायिक मालमत्ते’च्या श्रेणीत येत असेल, तर खालील चार पद्धतींद्वारे तुम्ही बरीच आर्थिक बचत करू शकता:

कर्जाच्या व्याजावरील वजावट: तुमच्या कार लोनच्या EMI वरील भाग हा ‘व्यावसायिक खर्च’ म्हणून मानला जातो. ITR भरताना, तुम्ही या व्याजाची संपूर्ण रक्कम तुमच्या व्यावसायिक नफ्यातून वजा करू शकता.
Depreciation वरील लाभ: व्यावसायिक मालमत्ता म्हणून, कालांतराने कारच्या मूल्यात होणारी घट ज्याला ‘घसारा’ म्हणजेच Depreciation म्हणतात. ती देखील कर सवलतींसाठी पात्र ठरते. यासाठी लागू होणारे दर हे वाहनाच्या प्रकारानुसार निश्चित केले जातात.
इंधन आणि देखभाल: कार चालवण्यासाठी होणारा खर्च जसे की इंधनाचे बिल आणि सर्व्हिसिंगचा खर्च हा देखील कर वजावटीच्या भागात येतो.
सेक्शन 80D अंतर्गत सवलत: काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, Self-employed individuals ला कारचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्यास, त्या आधारे अतिरिक्त कर वजावटीचा दावा करू शकतात.

Bank of India चा नफा 10500 कोटींच्या पार! आर्थिक कामगिरीत वार्षिक 14.19 टक्क्यांची दमदार वाढ

Web Title: How to get income tax benefits on car purchase and maintenance see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Business News
  • Car
  • emi
  • ITR File
  • Loan
  • Marathi News
  • tax

संबंधित बातम्या

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
1

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक
2

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?
3

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?
4

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.