निवडणूक आयोगाने 10 राज्यांतील राज्यसभा खासदार निवडणूक 2026 जाहीर केली (फोटो - सोशल मीडिया)
राज्यसभेचे महत्त्व आणि प्रक्रिया
राज्यसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो, परंतु दर दोन वर्षांनी, राज्यसभेच्या एक तृतीयांश सदस्यांनी त्यांच्या जागा रिक्त होतात आणि द्वैवार्षिक निवडणुका घेतल्या जातात. ही प्रक्रिया राज्यसभा पूर्ण कार्यरत राहते याची खात्री देते. लोकसभेप्रमाणे, राज्यसभा विसर्जित करता येत नाही, ज्यामुळे ती “कायमस्वरूपी सभागृह” आहे. राज्यसभेत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात, जे राज्य सरकारांद्वारे निवडले जातात. ही निवडणूक प्रणाली संसदेत स्थिरता आणि सातत्यपूर्ण प्रतिनिधित्व राखण्यास मदत करते.
हे देखील वाचा : रायगडमध्ये भाजपला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ? जिल्हा परिषदेत सत्तेचे नवे गणित
राज्यसभेमध्ये सर्वात जास्त जागा या महाराष्ट्राच्या असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सात खासदारांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तर यावर्षी सात खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ फ़ौज़िया तहसीन अहमद खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी अशोकराव पाटील, रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र राज्याचे राजकारण आणि समीकरण पूर्णपणे बदलल्यामुळे कोणते खासदार पुन्हा राज्यसभेवर जाणार आणि कोणाला नवीन संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
हे देखील वाचा : पैसे द्या अन् बांधकाम कामगार व्हा..; माणमध्ये एजंटगिरी आणि भ्रष्टाचार फोफावला
शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकारणार का?
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. शरद पवार यांचे सध्या 85 वय वर्षे आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा पदभार स्वीकारणार की नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवंगत नेते अजित पवारांचे निधन झाल्याने राष्ट्रवादी पक्षाची धुरा कोणाकडे जाणार आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये शरद पवारांची खासदारकीची मुदत संपत आली आहे.
कोणत्या राज्यात किती जागा रिक्त?
| राज्य | राज्यसभा जागा | खासदार |
|---|---|---|
| महाराष्ट्र | 7 | डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ फ़ौज़िया तहसीन अहमद खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी अशोकराव पाटील, रामदास आठवले |
| ओडिशा | 4 | ममता मोहंता, मुज़िबुल्ला खान, सुजीत कुमार, निरंजन बिशी |
| तमिलनाडू | 6 | एन.आर. एलंगो, पी. सेल्वारासु, एम. थम्बिदुरई, तिरुची सिवा, डॉ. कनिमोझी एन.वी.एन. सोमू, जी.के. वासन |
| पश्चिम बंगाल | 5 | साकेत गोखले, ऋतब्रत बनर्जी, बिकाश रंजन भट्टाचार्य, मौसम नूर, सुब्रत बक्शी |
| आसाम | 3 | रामेश्वर तेली, भुवनेश्वर कलिता, अजीत कुमार भुइयां |
| बिहार | 5 | अमरेंद्र धारी सिंह, प्रेम चंद गुप्ता, रामनाथ ठाकुर, उपेन्द्र कुशवाहा, हरिवंश नारायण सिंह |
| छत्तीसगड | 2 | कवि तेजपाल सिंह तुलसी, फूलो देवी नेताम |
| हरियाणा | 2 | किरण चौधरी, राम चंदर जांगड़ा |
| हिमाचल प्रदेश | 1 | इंदु बाला गोस्वामी |
| तेलंगाना | 2 | डॉ. अभिषेक मनु सिंघवी, के.आर. सुरेश रेड्डी |






