भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा 'यू'टर्न
दरम्यान, दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे श्रीलंकेत रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. याच प्रणालीचा परिणाम म्हणून शुक्रवारपासून रविवारदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईत मंगळवारी गारवा जाणवत असून पश्चिमेकडून येणाऱ्या सौम्य थंड वाऱ्यांमुळे हवामान आल्हाददायक झाले आहे. पुढील काही दिवस शहरात ढगाळ वातावरणासह सौम्य गारवा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
उन्हाळ्याची चाहूल, तरीही पावसाचा अनुभव घ्यावा लागणार आहे.
फेब्रुवारीच्या उत्तरार्धात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना, देशाच्या अनेक भागांत पावसाचा अनुभव घ्यावा लागेल, असे सध्याचे हवामान चित्र आहे. यामुळे काही भागांत तापमानात चढ-उतार तर काही ठिकाणी गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या आगमनामुळे वाऱ्याची दिशा पूर्णपणे बदलत आहे. तज्ज्ञांचे मते वाऱ्याची दिशा आता दक्षिणेकडून राजस्थान आणि मध्य प्रदेशकडे सरकेल. पंजाबपासून बिहारपर्यंत, तसेच गुजरात आणि महाराष्ट्रात हवेतील थंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, उत्तर भारतात सध्या किमान तापमान ७ ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तसेच सोमवारी दिल्लीत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. पंजाब आणि दिल्लीत सकाळी थंड वारे वाहू शकतात, परंतु सूर्य आता तेजस्वी आणि स्वच्छ असल्याने दिवसा आणि रात्री तापमानात वाढ होईल.






