
India Russia Partnership: Putin to visit India in December
India Russia Partnership : येत्या 5 डिसेंबरला रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार आहे. यामुळे रशिया-भारत या दोन देशातील मैत्रीचे पर्व सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भारताला स्वस्त कच्च्या तेलाची निर्यात केल्यानंतर आता भारताला दौऱ्यापूर्वीच रशियाने ‘स्पेशल ऑफर’ दिली आहे. ज्यामध्ये स्वस्त तेलानंतर एलएनजी आणि जहाजबांधणीसाठी करार करायची रशियाने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे रशिया-भारत यांच्यातील व्यापार संबंध घट्ट होतील यामुळे मात्र अमेरिकेच्या चिंतेत भर पडणार आहे.
रशियाने जहाज बांधणीच्या क्षेत्रात भारताला काही नवीन प्रस्ताव दिले आहेत. या प्रस्तावात मासेमारीसाठी लागणारी जहाजेसह प्रवासी जहाजे आणि इतर प्रकारचे सहायक जहाजांचा समावेश आहे. रशिया या जहाजांचे तयार डिझाइन किंवा नवीन डिझाइन बनवून देण्याच्या तयारीत आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये रशिया-भारत यांच्यात सागरी सहकार्य वाढवण्याच्या उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. या पुढाकाराने भारत-अमेरिका देशातील व्यापारी संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो.
हेही वाचा : एनएआर इंडिया सदस्यांसाठी मोफत NEO प्रवेश! नवीन तयार झालेल्या इन्व्हेंटरीमध्ये थेट दृश्यता
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीनचे खास सल्लागार आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाई पैट्रुशेव यांनी अलीकडेच भारताला भेट दिली होती. तेव्हा भारताचे जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना भेटून जहाज बांधणी, बंदरांचा विकास आणि सागरी लॉजिस्टिक्स या संबधित दोन्ही देशांच्या सहकार्य बाबत चर्चा केली होती. जहाजांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासह खोल समुद्रात संशोधन करणे यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यावर भर दिला. रशियाकडे विशेष जहाजे बनवण्याचा प्रचंड अनुभव असल्याचे रशियाने सांगितले.
रशियाने भारताला एलएनजी पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव पुन्हा दिला आहे. ऊर्जा मंत्री सर्गेई त्सिविलेव यांनी भारताचा गॅसचा वाटा 15% करण्याच्या उद्दिष्टाला रशिया मदत करेल असे सांगितले. स्वस्त कच्चे तेलही रशिया देत आहे. ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल कंपन्यांवर बंदी आणल्यानंतर भारताच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी, रशियाला कोणत्याही देशांनी व्यापार केला किंवा आर्थिक मदत केली तर त्यांच्यावर अतिरिक्त आयात शुल्क लावण्यात येईल. अशा परिस्थितीत, भारत रशियाच्या या प्रस्तावाला किती गांभीर्याने घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.