फोटो सौजन्य - Social Media
२०१२ मध्ये मियामी असोसिएशनसोबत लाँच झाल्यानंतर NEO ने फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये आपले स्थान निर्माण केले असून आता ते संपूर्ण अमेरिकेत विस्तारत आहे. REACH प्रोग्राम अंतर्गत दोनदा मान्यता मिळाल्यामुळे या प्लॅटफॉर्मची विश्वसनीयता अधिक वाढली आहे. सध्या जगभरातील ३० हून अधिक रिअल्टर्स असोसिएशन्स NEO वापरत असून आता एनएआर इंडिया या क्रमिक विस्ताराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. विशेष म्हणजे एनएआर इंडिया च्या सर्व सदस्यांना NEO चा वार्षिक 120 डॉलर्स इतक्या किमतीचा प्रवेश पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा लाभ सदस्यांना अमेरिकन रिअल इस्टेट आणि नव्या बांधकाम विक्रीबाबत वेबिनार, सविस्तर अहवाल, ट्रेनिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संबंध निर्माण करण्याच्या संधींसह दिला जाणार आहे. NEO मध्ये हिंदीसह अनेक भारतीय भाषा जोडल्याने भारतीय रियाल्टर्सना अमेरिकन बाजारपेठ समजणे आणि आपल्या ग्राहकांशी संवाद साधणे अधिक सोपे होणार आहे.
या भागीदारीबाबत बोलताना एनएआर इंडिया चे चेअरमन सुमंथ रेड्डी म्हणाले की, NEO भारतीय सदस्यांसाठी अमेरिकेच्या विशाल रिअल इस्टेट मार्केटकडे जाणारा थेट मार्ग उघडतो. तर वाईस चेअरमन तरुण भाटिया यांनी सांगितले की, भारतीय रियाल्टर्सना अमेरिकन डेव्हलपर्सशी प्रभावीपणे जोडणारा हा एक संरचित आणि डेटा-ड्रिव्हन प्लॅटफॉर्म आहे. अध्यक्ष अमित चोपडा यांनीही सर्व सदस्यांना जागतिक संधींपर्यंत समान प्रवेश मिळावा हा NAR India चा प्रयत्न असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावरील वाढत्या मागणीच्या काळात ही भागीदारी भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक नवा अध्याय ठरणार असून, एनएआर इंडिया सदस्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव, प्रशिक्षण आणि नवीन व्यावसायिक नेटवर्किंगचा लाभ मिळवण्याची संधी यातून उपलब्ध होणार आहे. म्हणूनच संस्थेने सर्व सदस्यांना NEO चा सक्रीय वापर करून ही सुवर्णसंधी साधण्याचे आवाहन केले आहे.






