IndiaBonds.com, जो SEBI-नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर (डेट विभाग) आणि परवानाधारक ऑनलाइन बॉन्ड प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर (OBPP) आहे, त्यांनी डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट्स (FDs) सुरू केले आहेत. या नवकल्पनेमुळे वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी स्थिर उत्पन्नाची गुंतवणूक अधिक सोपी, सोयीस्कर, आणि आकर्षक बनली आहे. या नवीन सुविधेमुळे IndiaBonds.com आता बॉन्ड्स आणि फिक्स्ड डिपॉझिट्स दोन्ही एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदान करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्नाच्या सर्व प्रकारच्या पर्यायांचा विचार आणि व्यवस्थापन एकाच ठिकाणी करण्याची सुविधा मिळत आहे. यामुळे पोर्टफोलिओ व्यवस्थापन अधिक सोपे आणि कार्यक्षम होणार आहे.
IndiaBonds.com चे डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट्स प्लॅटफॉर्म संपूर्णत: कागदविरहित आणि डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रिया प्रदान करते. जलद KYC प्रक्रियेमुळे गुंतवणूक सुरू करणे सुलभ झाले आहे. गुंतवणूकदारांना या प्लॅटफॉर्मवर फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी 9.4% पर्यंत व्याज मिळण्याची संधी मिळते. याशिवाय, प्लॅटफॉर्मवरील एकत्रित पोर्टफोलिओ डॅशबोर्ड गुंतवणूकदारांना त्यांचे रोख प्रवाह, परतावे, आणि स्थिर उत्पन्नाचे वाटप सुलभपणे ट्रॅक करण्यास मदत करते. फिक्स्ड डिपॉझिट्सच्या स्थिरतेसह आणि बॉन्ड्सच्या लवचिकतेसह, गुंतवणूकदार संतुलित व विविध पोर्टफोलिओ तयार करू शकतात.
गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाचे फायदे यातून होणार आहेत. यामधून गुंतवणूकदारांना वैयक्तिक पेआउट पर्याय उपल्बध करून देण्यात आला आहे. वापरकर्त्यांच्या गरजेनुसार परतावा घेण्याची सोय या माध्यमातून करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना कमी गुंतवणुकीतही फायदेशीर संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सर्व गुंतवणुका एका ठिकाणी करण्यासाठी ठिकाण उपल्बध करून देण्यात आले आहे. फिक्स्ड डिपॉझिट्स आणि बॉन्ड्स एकत्रित व्यवस्थापनाची सोय करून देण्यात आली आहे.
IndiaBonds.com येत्या काही आठवड्यांत अधिक FD भागीदारांसोबत प्लॅटफॉर्मवरील उत्पादने वाढवणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. दरम्यान IndiaBonds.com चे सह-संस्थापक विशाल गोयंका याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “IndiaBonds मध्ये, आम्ही नेहमीच वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी स्थिर उत्पन्नाच्या गुंतवणुकीला सोपे, पारदर्शक, आणि सहज उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट्स सुरू करणे हे आमच्या उत्पादन श्रेणी विस्तारातील नैसर्गिक पुढचे पाऊल आहे. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओचा समतोल राखत स्थिर उत्पन्नाच्या संधींचा फायदा घेता येईल.” ते पुढे म्हणाले, “आमचा प्लॅटफॉर्म सातत्याने विकसित होत असून, गुंतवणूकदारांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे ग्राहक अधिक चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकतील.”
IndiaBonds.com कडून सुरू केलेल्या डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट्समुळे गुंतवणूकदारांसाठी स्थिर उत्पन्नाच्या गुंतवणुकीच्या संधी अधिक सुलभ आणि आकर्षक बनल्या आहेत. या नवकल्पनेमुळे IndiaBonds.com च्या वचनबद्धतेला बळकटी मिळत असून, वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आर्थिक निर्णय घेणे अधिक सोपे झाले आहे.