SEBI Rules: SEBI ने IPO नियमांमध्ये केले मोठे बदल, स्टार्टअप संस्थापकांना मोठा दिलासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
SEBI Rules Marathi News: बाजार नियामक स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने IPO नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ इच्छिणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांच्या संस्थापकांना मोठा दिलासा मिळेल. नवीन नियमांनुसार, आता कर्मचाऱ्यांना IPO कागदपत्रे दाखल करण्यापूर्वी किमान एक वर्ष आधी दिलेले कर्मचारी स्टॉक पर्याय (ESOP) ठेवण्याची परवानगी आहे. अट अशी आहे की त्यांनी हे ESOP किमान एक वर्षापूर्वी घेतलेले असावे.
मिळालेल्या माहिती नुसार पूर्वी जर एखाद्या स्टार्टअप संस्थापकाला कंपनीचा प्रवर्तक मानले जात असे आणि त्याच्याकडे ESOP होते, तर कंपनी सार्वजनिक होण्यापूर्वी त्याला त्या ESOPs सोडून द्याव्या लागत असत. आता असे होणार नाही. सेबीच्या या निर्णयामुळे, स्टार्टअप्सना शेअर बाजारात प्रवेश करण्याचा मार्ग थोडा सोपा होईल अशी अपेक्षा आहे. सेबीने एका अधिसूचनेद्वारे या बदलाची माहिती दिली आहे.
यासोबतच, सेबीने इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज विभागाच्या सेटलमेंट वेळापत्रकातही बदल जाहीर केले आहेत. गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलादमुळे ५ आणि ८ सप्टेंबर रोजी सेटलमेंट सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे या दिवशी व्यवहारांचे सेटलमेंट पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे बाजार स्थिरता राखली जाईल आणि गुंतवणूकदारांना कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
सेबीने त्यांच्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की, कोणताही कर्मचारी किंवा संस्थापक, ज्याचा उल्लेख ड्राफ्ट ऑफर डॉक्युमेंटमध्ये प्रमोटर किंवा प्रमोटर ग्रुपचा भाग म्हणून केला गेला आहे आणि ज्याला आयपीओ पेपर्स दाखल करण्यापूर्वी किमान एक वर्ष आधी ईएसओपी, एसएआर म्हणजेच स्टॉक अॅप्रिसिएशन राइट्स किंवा इतर कोणताही लाभ मिळाला आहे, तो तो पुढे धारण करू शकतो.
भारतात लिस्टिंगची तयारी करणाऱ्या स्टार्ट-अप्ससाठी हा एक मोठा फायदा असेल. विशेषतः ज्या कंपन्या रिव्हर्स फ्लिपिंग करत आहेत म्हणजेच परदेशात नोंदणी झाल्यानंतर त्यांचा आधार भारतात परत हलवत आहेत. आता या कंपन्यांच्या संस्थापकांना त्यांचे ESOP विकण्याची सक्ती केली जाणार नाही आणि ते लिस्टिंगनंतरही हा फायदा टिकवून ठेवू शकतील. हा बदल रिव्हर्स फ्लिपिंगसाठी बूस्टर ठरू शकतो.