India's largest REIT IPO: नॉलेज रियल्टी ट्रस्ट ने आईपीओ लवकरच बाजारात, ब्लॅकस्टोन, सत्त्व डेव्हलपर्सनी सेबीकडे DRHP केले दाखल (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
India’s largest REIT IPO Marathi News: सत्व डेव्हलपर्स अँड ब्लॅकस्टोन द्वारा प्रायोजित, देशात अत्युच्य दर्जाच्या पोर्टफोलिओची मालकी व व्यवस्थापन करणाऱ्या नॉलेज रियाल्टी ट्रस्ट आरईआयटी संस्थेद्वारा, आयपीओच्या माध्यमातून युनिट विक्री करुन रु. 6200/- कोटी रुपये भांडवल उभारण्याच्या हेतुने नियामक संस्थेकडे दस्तावेज सादर करण्यात आले आहेत. प्रस्तुत आयपीओ सत्व डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बीआरईपी एशिया एसजी एल अँड टी होल्डिंग (एनक्यू) पीटीई लिमिटेड ॲक्सिस ट्रस्ट सरव्हीसेस लिमिटेड ट्रस्टी आहे. तसेच नॉलेज रियाल्टी ऑफीस मॅनेजमेंट सर्वीसेस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीश्रमीची ट्रीनीटी ऑफिस मॅनेजमेंट सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड ही इश्यू मॅनेजर आहे.
सदर आयपीओ इश्यू बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारा करण्यात येणार असून इश्यूपैकी 75 टक्क्यांपेक्षा अधिक युनिट बिगर सस्थात्मक गुंतपणूकदारांसाठी गुणोत्तर प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात येतील. यात स्ट्रॅटेजिक गुंतवणुकदारांचा गुणोत्तर प्रमाणातील राखीव युनिटचा समावेश नाही. तसेच त्यांच्यासाठी 25 टक्क्यांपेक्षा कमी युनिट उपलब्घ ठेवण्यात येणार अअसून त्यात स्ट्रॅटेजिक गुंतवणूकदारांच्या वाट्याचा समावेश नाही. आयपीओतून मिळणाऱ्या एकूण भांडवलापैकी रु. 5800/- कोटी ॲसेट एसपीव्ही वरील संस्थात्मक कर्ज व गुंतवणूकदारांवरील कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच काही भांडवल सामान्य हेतुंसाठी देखील वापरण्यात येणार आहे.
शेअरबाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर नॉलेज रियाल्टीह ट्रस्ट आरईआयटी ग्रॉस ॲसेट व्हॅल्यूच्या (जीएव्ही) आणि नॉन ऑपरेटींग इंकम (एनओआय) च्या तुलनेत देशातील सर्वात मोठा भारतीय आरईआयटी ठरणार आहे. तसेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठी आरईआयटी ऑफीस (लीज क्षेत्रानुसार) ठरणार असून जगातील मोठ्या आरईआयटी मध्ये समावेश होणार आहे. 30 सप्टेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार नॉलेज रियाल्टी ट्रस्टच्या पोर्टफोलिओत 30 ए ग्रेडच्या कार्यालयांचा समावेश असून त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ 48.1 दशलक्ष चौरसफूट आहे. यात 37.1 दशलक्ष चौरसफूट पूर्ण झालेल्या जागेचा समावेश असून 2.8 दशलक्ष चौरसफूट क्षेत्राचे बांधकाम सुरु आहे. तर 8.2 दशलक्ष चौरसफूट क्षेत्राची भविष्यातील बांधकामासाठी आखणी करण्यात आली आहे.
संस्थेच्या पोर्टफोलिआत सहा सीटी सेंटर ऑफीस बिल्डिंगचा व 24 बिझनेस पार्क सेंटरचा समावेश आहे. भारतातील ही सर्व केंद्र संबंधित उपबाजारपेठात सर्वोत्तम विकास केंद्र असल्याची नोंद सीबीआरई अहवालात नमूद करण्यात आली असून तसे ऑफर दस्तावेजासोबत देण्यात आले आहे. सूचीबद्ध झाल्यानंतर नॉलेज रियाल्टी देशातील सूचीबद्ध आरईआयटीमध्ये ॲसेट काउंट व लीजेबल क्षेत्राच्या तुलनेत सर्वात मोठा आरईआयटी पोर्टफोलिओ ऑफीस ठरणार आहे. कंपनीच्या मालमत्तांमध्ये विविध प्रकारच्या भाडेकरुंचा समावेश आहे. भाडेकरुमध्ये फ्यूचर 500 मधील मोठ्या बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या, ग्लोबल कॅपॅबिलीटी सेंटर (जीसीसीएस) आणि मोठ्या देशी कंपन्यांचा समावेश आहे.
कंपनीच्या सर्व मालमत्ता देशातील हैदराबाद, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई, गुरुग्राम, आणि अहमदाबादमधील गीफ्ट सीटी या सहा मोठ्या शहरात विखुरल्या आहेत. एकूण ग्रॉस ॲसेट व्हॅल्यू (जीएव्ही) पैकी बहुतांश म्हणजे 95.8 % व्हॅल्यू बेंगळुरु, हैदराबाद, आणि मुंबई या शहरात एकवटला आहे. ही शहरे देशातील देशातील सर्वाधिक कार्यक्षम ऑफीस मार्केटमध्ये मोडतात. मार्केट साईज, ॲब्सॉर्प्शन लेवल, यावरुन या मार्केटन पोर्टफोलिओ कोअर मार्केट असे म्हटले जाते.
बीआरईपी एशिया एसजी एल अँड टी होल्डिंग एनक्यू पीटीई लिमिटेड ही ब्लॅकस्टोन इंकॉ. कंपनीची पोर्टफोलिओ कंपनी आहे. नॉलेज रियाल्टी ट्रस्टने कंपनीला सहप्रायोजित केले आहे. यामुळे ही ब्लॅकस्टोन स्पॉन्सर कंपनी झाली आहे. ब्लॅकस्टोन ही जगातील सर्वात मोठी पर्यायी ॲसेट मॅनेजर कंपनी असून रियल इस्टेट क्षेत्रात कंपनीचे ॲसेट मूल्य 1.13 टिलिअन अमेरिकन डॉलर इतके आहे. कंपनी रियल इस्टेट, प्रायव्हेट इक्विटी, इंफ्रास्ट्रक्चर, लाईफ सायन्स, ग्रोथ इक्विटी, क्रेडीट, रियल इस्टेट, सेकंडरीज, आणि हेज फंडामध्ये सर्वात मोठी कंपनी ठरते.
सत्व डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सत्व समुहाचा घटक असून देशातील प्रमुख मोठ्या रियल इस्टेट विकासकांत समाविष्ट आहे. कंपनीकडे तीन दशकांचा अनुभव आहे. या दरम्यान कंपनीने सुमारे 734 दशलक्ष चौरस फूट रियल इस्टेट विकसित केली आहे. कंपनीचे देशातील सहा मोठ्या शहरात अस्तित्व आहे. वित्तीय वर्ष 2024 व 2023 मध्ये कंपनीने अनुक्रमे रु. 3,339.39 कोटी व रु. 2900.30 कोटी प्रचालन महसूल मिळवला आहे. यातून कंपनीला 2024 व 2023 वित्तीय वर्षात अनुक्रमे 336.44 व 218.49 कोटी करोत्तर नफा मिळाला आहे. 30 सप्टेंबर 2024 रोजी समाप्त सहामाहीत कंपनीने रु. 1881.63 कोटी प्रचालन महसूल मिळवला आहे.
आयपीओ इश्यूचे लीड मॅनेजर म्हणून कोटक महिंद्रा कॅपिवटल कंपनी लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरीटीज लिजमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, जे एम फायनान्शिअल लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड यांनी काम पाहिले आहे. तसेच केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी इश्यूची रजिस्ट्रार आहे. विक्रीपश्चात कंपनीचे युनिट बीएसई व एनएसई या प्रमुख शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात येणार आहेत.