Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Birla Jewellery च्या Indriyaकडून Festival धमाका, अक्षय तृतीयेनिमित्त ‘बडा शगुन, बडे ऑफर्स’

आदित्य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने ‘बडा शगुन, बडे ऑफर्स' या संकल्पनेवर आधारित आपली अक्षय्य तृतीया २०२६ कॅम्पेन लाँच केली आहे. ही कॅम्पेन इंद्रिया ब्रँडचे मूळ तत्व जपून महिलांचा दागिन्यांवरील प्रेम साजरं करते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 18, 2026 | 12:39 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आदित्य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने ‘बडा शगुन, बडे ऑफर्स’ संकल्पना
  • दागिने हे केवळ वस्तू नसून भावनांचं प्रतिक
  • आकर्षक ऑफर्स ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार – पांडा
Aditya Birla Jewellery  : आदित्य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने ‘बडा शगुन, बडे ऑफर्स’ या संकल्पनेवर आधारित आपली अक्षय्य तृतीया २०२६ कॅम्पेन लाँच केली आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचा सहभाग असलेली ही कॅम्पेन इंद्रिया ब्रँडचे मूळ तत्व जपून महिलांच्‍या दागिन्यांवरील अथांग प्रेमाला साजरे करते. भारतातील वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सांस्कृतिक पैलूंचा गौरव करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडने लोकप्रिय चित्रपट व टेलिव्हिजन अभिनेत्री कृती शेट्टी, रुपाली गांगुली, दृष्टी धामी, श्रुती झा, शिवांगी जोशी आणि स्पृहा जोशी यांच्यासोबत सहयोग केला आहे. याद्वारे विविध भारतीय उप-संस्कृतींमध्ये शुभ नवीन सुरुवात साजरी करणाऱ्या महिलांशी घनिष्ठ नाते निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.

LPG Pipeline: आता डायरेक्ट होणार Gas चा पुरवठा, देशात पसरणार 2500 किमी लांबीची एलपीजी पाइपलाइन

दागिने हे केवळ वस्तू नसून भावनांचं प्रतिक

या कॅम्पेनच्या माध्यमातून इंद्रियाचा अक्षय्य तृतीयेचे बदलणारे महत्त्व आणि मांगल्याची भावना अधोरेखित करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच, या सणादरम्यान भारताच्या विविध भागांमध्‍ये ‘बडा शगुन’ आणि परंपरांना कशा प्रकारे महत्त्व दिले जाते, हे दर्शवण्याचा ब्रँडचा प्रयत्‍न आहे. याच माहितीच्‍या आधारे इंद्रिया ग्राहकांना ‘बडा शगुन’ साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, जिथे ‘बडे ऑफर्स’मुळे केवळ धार्मिक विधी म्हणून दागिने खरेदी करण्याऐवजी अधिक आनंदाने आणि मनापासून साजरे करता येतील. येथे दागिने हे केवळ वस्तू नसून आकांक्षा, भावना आणि आनंदाचे प्रतीक बनतील.

आकर्षक ऑफर्स ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार – शांतिस्वरुप पांडा

या कॅम्पेनबाबत मत व्‍यक्त करत इंद्रियाचे मार्केटिंग आणि व्हिज्युअल मर्चेंडाइजिंग हेड शांतिस्वरूप पांडा म्हणाले, “ही कॅम्पेन साध्या, पण प्रभावी विचारावर आधारित आहे, ते म्हणजे, अक्षय्य तृतीया हा दिवस समृद्धी आणि अथांग प्रेमाचा दिवस आहे, जिथे हा सण प्रत्येकजण आपापल्या परीने जिव्हाळ्यासह आणि अर्थपूर्णरित्या साजरा करू शकतो. अदिती राव हैदरी यांच्या नेतृत्वाखालील आणि प्रादेशिक अभिनेत्रींच्या सहयोगामुळे अधिक प्रभावी झालेली ही कॅम्पेन मानसिकतेतील सूक्ष्म बदल निदर्शनास आणते, जिथे दागिने हे केवळ सणाचे प्रतीक नसून त्या क्षणाचे वैयक्तिक आणि आनंददायी प्रतीक बनतात. आमच्या आकर्षक ऑफर्स ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार हा समृद्ध सण साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहेत.”

दागिने आपल्या संस्कृतीशी जोडलेले – स्पृहा जोशी

अक्षय तृतीयेच्या या शुभ प्रसंगी, स्पृहा जोशी म्हणाल्या: “सण मनापासून साजरे करणे आणि कुटुंबासोबत परंपरा जपणे, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मला माझ्या पेहरावातून आपली महाराष्ट्रीयन परंपरा जपायला खूप आवडते आणि इंद्रियाचे दागिने नेमका तोच वारसा सुंदरपणे दाखवतात, जे आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत, अर्थपूर्ण आहेत आणि अक्षय्य तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तासाठी अगदी योग्य आहेत.”

ही कॅम्पेन म ३६०-डिग्री मीडियाद्वारे प्रसारित केली जात आहे, ज्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या काळात ब्रँडची भक्‍कम व विनासायास उत्सवी उपस्थिती दिसेल. या कॅम्पेनद्वारे, इंद्रिया दागिन्यांचे आधुनिक केंद्र म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे, असे केंद्र जे वारशाचा गौरव करते, तसेच ग्राहकांना हा वारसा अधिक अर्थपूर्ण, महत्त्वाकांक्षी आणि समृद्ध पद्धतीने व्यक्त करण्यासाठी प्रेरित करते.

Thalapathy Vijay net worth: 8 ग्रॅम सोनं देण्याची घोषणा, विजयची अमाप संपत्ती; आकडा वाचून येईल चक्कर

Web Title: Indriya aditya birla jewellery akshaya tritiya 2026 offers campaign see for more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Aditya Birla
  • Akshaya Tritiya
  • Big Offer
  • Business
  • Business News
  • Discount Offer
  • Gold
  • Gold Jewellery
  • Marathi News

संबंधित बातम्या

Parenting Tips : नवजात बाळाला जन्मानंतर १२ दिवस सोन्याचे दागिने का घालू नयेत? जाणून घ्या कारण
1

Parenting Tips : नवजात बाळाला जन्मानंतर १२ दिवस सोन्याचे दागिने का घालू नयेत? जाणून घ्या कारण

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…
2

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
3

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली
4

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.