Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story: 38 हजारची नोकरी सोडून सुरू केली चहाची टपरी, लोकांनी वेड्यात काढलं; पण आज कमवतोय दरमहा 100000 रुपये

आजकाल अनेक तरुण नोकरीच्या चौकटीबाहेर पडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखवत आहेत. अशीच एक थक्क करणारी यशोगाथा समोर आली आहे एका तरुणाची, ज्याने महिन्याला ३८,००० रुपये मिळवून देणारी चांगली नोकरी सोडून चहाची टपरी सुरू केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 19, 2026 | 05:40 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • 38 हजारची नोकरी सोडून सुरू केली चहाची टपरी,
  • लोकांनी वेड्यात काढलं;
  • आज कमवतोय दरमहा 100000 रुपये
Success Story: आजच्या जगात, जिथे लोक सतत सुरक्षित नोकरीच्या शोधात असतात, तिथे काही जण स्वतःचे भविष्य घडवण्याचे धाडस करतात. स्वतःचा वेगळा रस्ता निवडतात आणि स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण करतात. अशाच एका युवकानं रोजच्या जॉबपलिकडे जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. सध्या त्याची ही स्टोरी ‘एक्स’ नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. अंकित पांडे नावाच्या एका युजर्सची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यामध्ये, त्याने सांगितले आहे की, त्याच्या शेजाऱ्याने महिन्याला ३८,००० रुपये पगार असलेली नोकरी सोडून एक यशस्वी व्यवसाय सुरू केला आहे.. आता हा व्यवसाय त्याला सर्व खर्च वजा जाता १ लाख रुपये मिळवून देतो. नेमकी सुरुवात कुठे होते संपूर्ण स्टोरी जाणून घेऊयात.

IRCTC New Chairman: शिक्षणामध्ये नेहमीच टॉपर; आता सांभाळणार IRCTC ची कमान! जाणून घ्या कोण आहेत नवे CMD राहुल हिमालियन

लोकांकडून वेड्यात काढलं गेलं

अंकितने त्याच्या शेजाऱ्याची संपूर्ण स्टोरी सांगितली. त्याचा शेजारी पूर्वी टेलिपरफॉर्मन्समध्ये काम करत होता आणि त्याला दरमहा सुमारे ३८,००० रुपये पगार मिळत होता. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्यात फारसा संवाद होत नव्हता. या वर्षी मे महिन्यात, त्याच्या शेजाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला. जेव्हा त्याने नोकरी सोडली, तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आणि ओळखीच्या लोकांना वाटले की तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे आणि एक मोठी चूक करत आहे. अशा शब्दात त्याला ऐकवत त्याला वेड्यात काढलं.

Today my neighbour rang my doorbell and handed me a box of sweets. We hardly meet because of our busy schedules. A few months ago, he was working at Teleperformance, earning around ₹38,000 a month. In May, he resigned. Everyone thought he was making a mistake. Instead, he… — Ankit Pandey (@iamankitpande) July 18, 2026

ऑटो स्टँडजवळ चहाचे दुकान उघडले

लोकांच्या मताची पर्वा न करता, तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्याने सुमारे २ लाख रुपये गुंतवून एका ऑटो स्टँडजवळ एक सुंदर डिझाइन केलेले चहाचे दुकान उघडत बिझनेस उभा केला. . दुकान सुरळीत चालावे यासाठी, त्याने चहा तयार करण्यासाठी आणि देण्यासाठी दोन महिला कर्मचाऱ्यांनाही कामावर ठेवले. तो साधा चहा १० रुपयांना आणि प्रीमियम चहा किमान २० रुपयांना विकतो.

महिन्याचा टर्नओव्हर ₹१.८ लाख

दुकान उघडल्याबरोबरच त्याची कल्पना यशस्वी ठरली. आज, त्याच्या स्टॉलवर दररोज अंदाजे ४०० कप चहा विकला जातो. यामुळे त्याचे दैनंदिन उत्पन्न सुमारे ₹६,००० होते, परिणामी त्याची मासिक उलाढाल अंदाजे ₹१.८ लाख होते. त्याचा खर्च खालीलप्रमाणे आहे:
दुकानाचे भाडे: ₹२५,०००
कर्मचाऱ्यांचे पगार: ₹३०,०००
वीज आणि कच्चा माल (दूध, साखर, चहापत्ती, इत्यादी): ₹२५,०००

₹१ लाखांचा निव्वळ नफा

हे सर्व खर्च वजा केल्यावरही, त्याला दर महिन्याला सुमारे ₹१ लाखांचा निव्वळ नफा मिळतो. हा त्याच्या पूर्वीच्या पगाराच्या म्हणजेच ₹३८,००० जवळपास अडीच पट आहे.

नवीन व्यवसायाच्या तयारीत

ही गोष्ट फक्त चहापुरती मर्यादित नाही. आपल्या व्यवसायात यश मिळवल्यानंतर, त्याने त्याचा आणखी विस्तार केला आहे. अलीकडेच, त्याने आपल्या दुकानाजवळ वडा पाव, समोसे आणि जिलेबी विकणारे एक नवीन काउंटर उघडले आहे. या नवीन सुरुवातीचा आनंद साजरा करण्यासाठी, त्याने आपला शेजारी अंकितला मिठाईचा एक बॉक्सही दिला.

Money Management Tips : सॅलरी कितीही असू द्या, तुमचं बँक अकाउंट कधीच खाली होणार नाही! वापरा 50-20-30 मॅजिकल फॉर्म्युला

Web Title: Marathi success story youth quits 38000 job starts tea stall now earns 1 lakh monthly profit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Business
  • Business Idea
  • Business News
  • healthy tea
  • Marathi News
  • success tips

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
2

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
3

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
4

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.