'या' नामांकित कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात खुला; वाचा... कितीये किंमत पट्टा!
गहू, हरभरा आणि कापूस यांच्या उच्च दर्जाच्या बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा आयपीओ आज (ता.९) उघडला आहे. आयपीओ उघडण्यापूर्वी पाच अँकर गुंतवणूकदारांकडून 6.37 कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांना 55 रुपयांच्या किंमतीला 11.58 लाख शेअर जारी केले आहेत. ग्रे मार्केटमध्ये शेअर्स आयपीओच्या अप्पर प्राइस बँडवरून 28 रुपये म्हणजेच 50.91 टक्के जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) वर व्यवहार होत आहेत.
किती आहे आयपीओचा किंमत बँड
धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा 23.80 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 52-55 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. तर आयपीओचा लाॅट आकार हा 2000 शेअर्सचा आहे. हा आयपीओ 11 डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. शेअर्सचे वाटप 12 डिसेंबर रोजी अंतिम होईल. तर लिस्टिंग एनएसई एसएमईवर 16 डिसेंबर रोजी होईल. आयपीओचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस आहेत. या आयपीओ अंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 43.28 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. कंपनी या शेअर्सद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजा, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे आणि जारी संबंधित खर्चांसाठी करेल.
(फोटो सौजन्य – istock)
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून ‘या’ नियमात मोठा बदल!
धनलक्ष्मी क्रॉप सायन्सबद्दल थोडक्यात
2005 मध्ये स्थापन झालेली धनलक्ष्मी क्रॉप सायन्स अनेक पिके आणि भाजीपाला बियाणे तयार करते. मार्च 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यांनी 24 विविध प्रकारच्या पिके आणि भाजीपाल्याची बियाणे तयार केली आहेत. कंपनीचा व्यवसाय देशातील 5 राज्यांमध्ये पसरलेला आहे. त्याचा बहुतेक नफा कापूस बियाण्यांमधून येतो, ज्याचा आर्थिक वर्ष 2024 मधील ऑपरेटिंग नफ्यात 76.78 टक्के वाटा होता. त्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये कापूस, गहू, मका, हरभरा, सोयाबीन, मोहरी, भुईमूग, गवार, धणे, वाटाणे आणि कांदा इत्यादींचा समावेश आहे.
कितीही पैसे कमावले, तरीही ‘या’ राज्यात नाही भरावा लागत आयकर! वाचा… कोणते आहे हे करमुक्त राज्य!
कितीये कंपनीचा निव्वळ नफा
आर्थिक वर्ष 2022 मध्ये धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा निव्वळ नफा 58.28 लाख रुपये होता. जो पुढील आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.00 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये 4.65 कोटी रुपये झाला. या कालावधीत कंपनीचा महसूल एप्रिल-सप्टेंबर 2024 च्या पहिल्या सहामाहीत 8.21 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि 119.96 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)