उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये गोवन पद्धतीमध्ये बनवा कोकम तिवळ, अॅसिडिटी रामबाण घरगुती उपाय
कडाक्याची थंडीनंतर देशभरात सगळीकडे उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या वेळी कडक उन्हात कुठेही जाऊन आल्यानंतर डोकेदुखीचा किंवा पित्ताचा त्रास होतो. पित्ताचा त्रास वाढू लागल्यानंतर ऍसिडिटी, गॅस, मळमळ, डोकेदुखी, उलट्या यांसारख्या असंख्य वेदना होतात. कोणताही तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा तेलकट खाल्ल्यानंतर काहींना लगेच ऍसिडिटी होते. ऍसिडिटीमुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. वारंवार उद्भवणाऱ्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उन्हाळ्यात कोकम तिवळ बनवून प्यावे. हा पदार्थ कोकण आणि गोव्यातील प्रत्येक घरात अतिशय आवडीने बनवून प्याला जातो. जेवणाच्या ताटात जर कोकमाची कढी किंवा तिवळ नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी कोकम रामबाण उपाय मानले जातात. कोकमचा चमचाभर रस पाण्यात मिक्स करून प्यायल्यास ऍसिडिटी पूर्णपणे नष्ट होईल. सोलकढी बनवताना खोबऱ्याच्या दुधाचा वापरत केला जातो. पण त्याऐवजी नुसत्याच कोकम सरबताचा वापर करून तुम्ही तिवळ किंवा ‘फुटी कढी’ बनवू शकता. कोकम तिवळ हे एक पेय नसून शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया कोकम तिवळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Ramdan 2026 : मोहम्मद अली रोडपासून जामा मस्जिदपर्यंत पदार्थांच्या या नगरीत जाताच रंगून जाल






