काय घडलं नेमकं?
आरोपी सुरज हा अशोक खरात ऊसतोड मजुरांच्या टोळीचा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता. त्याने अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवला. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुर्डी सोने सांगवी ता. केज शिवारातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले होते. त्यांनतर ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पुन्हा त्याने अल्पवयीन मुलीवर केज पोलीस ठाणे हद्दीतील हदगावातील एका शेतात नेत कोयत्याचा धाक दाखवून दुसऱ्यांदा अत्याचार केला.
या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून 10 फेब्रुवारीला आरोपी सुरज अशोक खरात याच्याविरुद्ध युसुफवडगाव ता. केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुरज खरात हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. २० फेब्रुवारी रोजी तो पिंक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके यांच्या पुढे हजर झाला. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.
काय नेमकं प्रकरण?
धर्मराज बडे (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धर्मराज बडे यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब कांबळे यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कांबळे हे बडे यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी पैशांसाठी तगादा लावत कुटुंबीयांविषयी अपमानास्पद व अश्लील शब्द वापरल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे धर्मराज बडे मानसिक तणावात होते. अखेर त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्र त्यांनी घेतला होता.
कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या
Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात, सुर्डी-सोने सांगवी परिसरात.
Ans: 4 जानेवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी दोनदा अत्याचार केल्याचा आरोप.
Ans: आरोपी पोलिसांसमोर हजर झाला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.






