व्वा रे पठ्ठ्या..! नामांकित कंपनीविरोधात कोर्टात गेला; मिळवली तब्बल 126 कोटींची नुकसान भरपाई, वाचा... काय आहे प्रकरण!
लहान बाळ असणाऱ्या प्रत्येकाच्या घरात जॉन्सन अँड जॉन्सन या नावाबाबत प्रत्येकजण परिचित आहे. अशातच आता या मोठ्या कंपनीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनला एका व्यक्तीला 15 मिलियन डॉलर्स किंवा सुमारे 126 कोटी रुपये भरपाई द्यावी लागणार आहे. खरे तर, या व्यक्तीने 2021 मध्ये खटला दाखल केला होता आणि कंपनीच्या बेबी पावडरबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच दावा केला होता की, जॉन्सन अँड जॉन्सनच्या सतत वापरामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. याच पार्श्वभुमीवर हे संपूर्ण प्रकरण काय आहे, याबाबत जाणून घेणार आहोत…
कंपनीविरुद्ध खटला दाखल
अमेरिकेतील राज्य असलेल्या कनेक्टिकटमधील इव्हान प्लॉटकिन या व्यक्तीने जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरवर आरोप लावला आहे. यात म्हटले आहे की, अनेक दशकांपासून या टॅल्क पावडरचा वापर केल्यामुळे त्याला मेसोथेलियोमासारखा दुर्मिळ कर्करोग झाला आहे. या व्यक्तीने 2021 मध्ये त्याच्या आजाराचे निदान झाल्यानंतर कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता.
फेअरफिल्ड काउंटी, कनेक्टिकट सुपीरियर कोर्टात दावा दाखल केलेल्या या प्रकरणात त्याने म्हटले होते की, जॉन्सन अँड जॉन्सन या बेबी पावडरच्या वापरामुळे त्याला गंभीर आजार झाला होता. ज्युरीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि असे आढळले की, जॉन्सन अँड जॉन्सनने नुकसान भरपाई द्यावी. जी नंतर केस हाताळणाऱ्या न्यायाधीशांद्वारे निश्चित केली जाईल. आता कंपनीला 15 दशलक्ष डॉलर्स देण्यास सांगितले आहे.
नेमकं काय म्हटलंय कंपनीने
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरबाबत असे गंभीर आरोप करणारे इव्हान प्लॉटकिनचे वकील बेन ब्रिले यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे. त्यांच्या चाचणी टीमने जॉन्सन अँड जॉन्सनला पुन्हा एकदा दोषी ठरवले आहे. एस्बेस्टोस (एक प्रकारचा हानिकारक फायबर) असलेल्या बेबी पावडर उत्पादनाच्या विपणन आणि विक्रीसाठी सरकारला जबाबदार धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे,जॉन्सन अँड जॉन्सनच्या वतीने, एरिक हास (लिटिगेशन अफेयर्सचे उपाध्यक्ष) यांनी ज्युरीच्या निर्णयावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी ट्रायल जजच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध अपील करेल. ज्युरींना खटल्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी ऐकण्यापासून रोखण्यात आले. जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी टॅल्क सुरक्षित आहे. आणि त्यात एस्बेस्टोस नाही हे वैज्ञानिक चाचण्यांनी आधीच पुष्टी केली आहे. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारचा कर्करोग होत नाही.
कंपनीचा भारतात मोठा व्यवसाय
अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनचाही भारतात मोठा व्यवसाय आहे. ती दीर्घकाळापासून देशात बेबी पावडरची विक्री करत आहे. कंपनीचे जॉन्सन बेबी पावडर भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. ही पावडर बहुतेक घरांमध्ये लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. बेबी पावडर व्यतिरिक्त, कंपनी भारतात बेबी शॅम्पू, बेबी सोप आणि बेबी ऑइल देखील विकते. ज्यांना प्रचंड मागणी आहे.