Maharashtra breaking News Marathi
03 Jan 2026 11:53 AM (IST)
महापलिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचे रणशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत सांगलीत शनिवारी (दि.3) फुंकले जाणार आहे. येथील स्टेशन चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीरसभा होणार असून, त्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहराच्या विकासाबाबत मुख्यमंत्री नेमके काय बोलणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत.
03 Jan 2026 11:43 AM (IST)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाकड, तथवडे, पुनावळे आणि परिसरात गेली 15 वर्षांपासून समाज कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पत्नी श्रुती वाकडकर यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातून नागरिकांपर्यंत पोहचणाऱ्या श्रुती वाकडकर या प्रभाग २५ : वाकड, ताथवडे, पुनावळे येथून लढत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी गाठीभेटीवर लक्ष दिले असून मोठा उत्सहात स्वागत केले जात आहे.
03 Jan 2026 11:33 AM (IST)
मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर समोर आली आहे. ३७ वर्षीय गर्भवती महिला पोलीस शिपायाच्या पतीने पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना अंधेरी पोलीस ठाण्यात घडल्याचे समोर आले आहे. महिला पोलीस शिपायाने याप्रकरणी पती, पतीची आई आणि त्याच्या तीन बहिणींवरही गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे.
03 Jan 2026 11:23 AM (IST)
महानगरपालिका निवडणुकीत यंदा तिकीट वाटपानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना कार्यकर्त्यांच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः भाजपमध्ये असंतोष अधिक ठळकपणे समोर आला. ही नाराजी थेट निवडणूक निकालांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नामनिर्देशन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.
03 Jan 2026 11:13 AM (IST)
प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू गुरप्रीत सिंग संधू, सुनील छेत्री आणि संदेश झिंगण यांनी भारतीय फुटबॉलमधील सध्याच्या संकटाबाबत एक खास व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. या व्हिडिओ संदेशात तिघांनीही फिफाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. २ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये, या खेळाडूंनी, इतर अनेक आयएसएल (इंडियन सुपर लीग) स्टार्ससह, अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशन (एआयएफएफ) च्या अपयशाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली.
03 Jan 2026 11:03 AM (IST)
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला अवघे १२ दिवस शिल्लक असतानाच राज्यभरात ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या बिनविरोध निवडींची विजय घोषणा होणार नसल्याची माहिती आयोगाने दिली आहे. केडीएमसीमध्ये भाजपचे १४ आणि शिवसेना (शिंदे गट)चे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे किमान एक भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
03 Jan 2026 10:59 AM (IST)
प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू गुरप्रीत सिंग संधू, सुनील छेत्री आणि संदेश झिंगण यांनी भारतीय फुटबॉलमधील सध्याच्या संकटाबाबत एक खास व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. या व्हिडिओ संदेशात तिघांनीही फिफाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. २ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये, या खेळाडूंनी, इतर अनेक आयएसएल (इंडियन सुपर लीग) स्टार्ससह, अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशन (एआयएफएफ) च्या अपयशाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली.
03 Jan 2026 10:53 AM (IST)
xAI चे AI चॅटबॉट Grok सध्या बरेच चर्चेत आहे. या चर्चेचं कारण आहे Grok वर सुरु असलेला अजब ट्रेंड. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि Grok वर सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु झाला आहे. यूजर्सनी या ट्रेंडला पूट हर इन अ बिकीनी (Put her in a bikini) असं नाव दिलं आहे. ज्यामध्ये Grok च्या मदतीने लोकं इतरांचे बिकिनी फोटो तयार करत आहेत. यामुळे काही लोकं हा ट्रेंड मजा मस्ती करण्यासाठी वापरत आहेत. तर काहीजण या ट्रेंडमुळे हैराण झाले आहेत. Grok चे मालक एलन मस्क देखील या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत.
03 Jan 2026 10:47 AM (IST)
मध्य प्रदेशविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये साई सुदर्शन गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात बरगडीला दुखापत झाल्याने युवा भारतीय फलंदाज साई सुदर्शन एक महिन्याहून अधिक काळ मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने शुक्रवारी सांगितले. सुदर्शन भारताच्या व्हाईट-बॉल संघाचा भाग नाही.
03 Jan 2026 10:39 AM (IST)
दशकभरापासून गृहयुद्धाच्या आगीत होरपळणारा येमेन आता कायमचा दोन तुकड्यांत विभागला जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण येमेनमधील (Yemen) शक्तिशाली फुटीरतावादी गट सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STC) ने एक ऐतिहासिक आणि तितकाच वादग्रस्त निर्णय घेत स्वतंत्र ‘संविधान’ जारी केले आहे. या निर्णयामुळे सौदी अरेबियाचा पारा चढला असून, त्यांनी दक्षिण येमेनमधील फुटीरतावाद्यांच्या तळांवर जोरदार हवाई हल्ले (Air Strikes) सुरू केले आहेत. यामुळे येमेनमध्ये आता केवळ अंतर्गत बंडखोरी राहिली नसून, सौदी आणि युएई मधील ‘प्रॉक्सी वॉर’ उघडपणे समोर आले आहे.
03 Jan 2026 10:31 AM (IST)
फलंदाजी दिग्गज विराट कोहलीने त्यांचे विजय हजारे ट्रॉफी (VHT) चे दोन्ही सामने सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे प्रेक्षकांशिवाय खेळले, त्याचप्रमाणे शनिवारी जयपूरमधील जयपुरिया कॉलेज मैदानावर पंजाब विरुद्ध सिक्कीम संघाच्या सामन्यादरम्यान भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निर्देशानुसार, भारतीय कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ३ आणि ६ जानेवारी रोजी सिक्कीम आणि गोवा विरुद्ध पंजाबचे पुढील दोन विजय हजारे ट्रॉफी सामने खेळणार आहे.
03 Jan 2026 10:22 AM (IST)
सोलापुरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राजकीय वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहबे सरवदे यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे. अमित साहेबांचा राईट हॅन्ड आहे. तआधी त्यांच्या डोळ्यात चटणी घालण्यात आली नंतर त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली. यावर मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे.
03 Jan 2026 10:17 AM (IST)
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या ग्राहकांना एक खास सरप्राईज दिलं आहे. कंपनीने देशभरातील सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये वायफाय कॉलिंग म्हणजेच Voice over WiFi (VoWiFi) सेवा अखेर लाँच केली आहे. त्यामुळे आता कंपनीच्या यूजर्सना कॉल ड्रॉप होण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. यूजर्स थेट वायफायद्वारे कॉल करू शकणार आहेत आणि रिसिव्ह करू शकणार आहेत. कंपनीने सुरु केलेली ही नवीन सर्विस यूजर्ससाठी प्रचंड फायद्याची ठरणार आहे.
03 Jan 2026 10:09 AM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून आता ६७ लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
03 Jan 2026 10:05 AM (IST)
अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. ISIS कडून प्रेरित होऊन हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली १८ वर्षीय ख्रिश्चन स्टर्डिव्हंट याला अटक करण्यात आली आहे. एफबीआयनुसार, आरोपीवर दहशतवादी संघटना ISIS ला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, तो एका किराणा दुकानावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
03 Jan 2026 09:55 AM (IST)
हरियाणातील सिरसा जिल्हा कारागृहाचे वॉर्डन सुखदेव सिंग यांनी सल्फा सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी दोन सुसाईड नोट्स मागे ठेवल्या असून, त्यात तुरुंग डीएसपीसह दोन अधिकाऱ्यांनी कर्तव्याच्या नावाखाली मानसिक छळ केल्याचा आणि सार्वजनिकरित्या माफी मागण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या तणावामुळेच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आत्महत्येपूर्वी वॉर्डनने आपल्या मुलाला फोन करून विष घेत असल्याची माहिती दिली होती. बॅगेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेली सुसाईड नोट असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मृताच्या कुटुंबाने सिरसा पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करत आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे. या प्रकरणाचा तपास हुडा पोलिसांकडून सुरू आहे.
03 Jan 2026 09:45 AM (IST)
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (BCCI) आज न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत प्लेअर ऑफ द सिरीज ठरलेला रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करणारा विराट कोहली यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. केएल राहुल प्रमुख विकेटकीपर असेल, हेही ठरलेले असले तरी दुसऱ्या विकेटकीपरसाठी ऋषभ पंत आणि ईशान किशन यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते.
देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता असून, तो बॅकअप विकेटकीपरसोबतच बॅकअप ओपनर म्हणूनही संघ व्यवस्थापनाचा पसंतीचा पर्याय ठरू शकतो. गरज भासल्यास मधल्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने ईशान हा केएल राहुलसाठी मजबूत पर्याय मानला जात आहे.
03 Jan 2026 09:35 AM (IST)
माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, पण तेच आरोप करणारे आज माझ्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत, असा बिनतोड युक्तिवाद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. सत्ताधाऱ्यांचे एकमेव लक्ष्य भ्रष्टाचारातून पैसा कमावणे असल्याचा दावा करत, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेली पिंपरी-चिंचवड कर्जाच्या खाईत कशी लोटली गेली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच महापालिकेच्या ८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.
03 Jan 2026 09:28 AM (IST)
Maharashtra Municipal Election 2026: महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला अवघे १२ दिवस शिल्लक असतानाच राज्यभरात ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या बिनविरोध निवडींची विजय घोषणा होणार नसल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
03 Jan 2026 09:21 AM (IST)
भारत केवळ सभ्यतेची जननी नाही, तर आस्था आणि चमत्कारांचा देश देखील आहे. येथे हजारो वर्षे जुनी अशी अनेक मंदिरे आहेत, जी केवळ धार्मिक स्थळ म्हणून नाही, तर स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी एक वेगळाच अनुभव मिळतो. काही ठिकाणी ऊर्जा अशी प्रबल आहे की मनापासून केलेली मनोकामना पूर्ण होतात, तर काही ठिकाणी मूर्ती आणि शिल्पकलेची अचाट भव्यता पाहून आश्चर्य वाटते. भारतातील प्राचीन मंदिरे केवळ श्रद्धेचे केंद्र नाहीत, तर ते इतिहास, कला आणि संस्कृतीची साक्षीदार देखील आहेत. या लेखात आपण 6 अशा अद्भुत मंदिरांचा प्रवास करू, जे हजारो वर्ष जुने असूनही आजही लोकांना आकर्षित करतात आणि त्यांच्या दिव्यतेमुळे हृदयाला स्पर्श करतात. नवीन वर्षी तुम्हीही देवाचे दर्शन घेऊ इच्छित असाल तर या जुन्या प्राचीन मंदिरांना आवर्जून भेट द्या.
03 Jan 2026 09:20 AM (IST)
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीन सरकते. भारतासह जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. अपुरी झोप, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या, पोषक घटकांचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरास सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. दैनंदिन आहारात झालेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात चवदार म्हणून खाल्लेले जाणारे कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात,
राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून आता ६७ लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.






