ज्या दिवशी स्त्रीवाद्यांनी 'स्त्री मुक्ती' चळवळ रस्त्यावर आणली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Women’s Liberation Movement London 1971 march : स्त्रीमुक्तीच्या गप्पा आज आपण सर्वजण करतो, पण या चळवळीने रस्त्यावर उतरून व्यवस्थेला कधी हादरवले? तो दिवस होता ६ मार्च १९७१. लंडनमध्ये कडाक्याची थंडी, कोसळणारा बर्फ आणि गारांचा मारा सुरू असताना हजारो महिलांनी आपल्या हक्कांसाठी हायड पार्क ते ट्रॅफलगर स्क्वेअरपर्यंत पायपीट केली. आज या ऐतिहासिक घटनेला अर्धशतकाहून अधिक काळ लोटला असला, तरी त्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या ‘त्या’ वीरांगनांच्या डोळ्यांतील ठिणगी आजही प्रेरणादायी आहे.
“खूप थंडी होती, पण वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह होता,” अशा शब्दांत इतिहासकार शीला रोबोथम त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देतात. १९७१ च्या त्या शनिवारी सुमारे ४,००० महिला, मुले आणि काही संवेदनशील पुरुषांनी हायड पार्क येथे एकत्र जमून मोर्चाची सुरुवात केली. त्यांच्या हातात बॅनर होते, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते “Women Unite” (स्त्रियांनो, एकत्रित व्हा!).
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
या मोर्चाने स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्नांना वाचा फोडली. स्त्रियांनी सरकारसमोर चार मुख्य मागण्या ठेवल्या होत्या: १. समान वेतन (Equal Pay): पुरुषांच्या बरोबरीने काम करूनही कमी पगार मिळण्याविरुद्ध एल्गार. २. शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी: केवळ घर सांभाळणे हे स्त्रीचे कर्तव्य नाही, हे ठणकावून सांगितले. ३. मोफत गर्भनिरोधक आणि गर्भपाताचा अधिकार: स्वतःच्या शरीरावर स्वतःचे नियंत्रण असावे, ही मागणी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या करण्यात आली. ४. २४ तास पाळणाघरे: नोकरी करणाऱ्या मातांसाठी मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सरकारने घ्यावी.
हा मोर्चा केवळ घोषणाबाजीपुरता मर्यादित नव्हता. आंदोलकांनी स्ट्रीट थिएटर आणि गाण्यांचा वापर करून लोकांचे लक्ष वेधले. एका प्राममध्ये (मुलांच्या गाडीत) ग्रामोफोन ठेवून त्यावर त्या काळातील लैंगिकतावादी गाणी वाजवून त्यांचा निषेध केला जात होता. स्त्रियांकडे केवळ ‘सुंदर दिसण्याचे साधन’ म्हणून पाहणाऱ्या मानसिकतेला या मोर्चाने आरसा दाखवला. रिजेन्ट स्ट्रीटवर खरेदी करणाऱ्या अनेक मध्यमवर्गीय महिलाही त्या दिवशी आपली पिशवी बाजूला ठेवून या मोर्चात सामील झाल्या होत्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
इतिहासकार सॅली अलेक्झांडर सांगतात की, त्याकाळी मातृत्वामुळे नोकरीच्या बाजारात महिलांना मोठा भेदभाव सहन करावा लागत असे. “आम्ही फक्त निषेध करत नव्हतो, तर आम्ही जग बदलत होतो,” असे त्या म्हणतात. आजही त्या मोर्चातील अनेक निदर्शक एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. त्यांनी सुरू केलेल्या त्या लढ्यामुळेच आज आपण कामाच्या ठिकाणी समान अधिकारांबद्दल बोलू शकत आहोत.
Ans: हा ऐतिहासिक मोर्चा ६ मार्च १९७१ रोजी ब्रिटनची राजधानी लंडन येथे हायड पार्क ते ट्रॅफलगर स्क्वेअर दरम्यान काढण्यात आला होता.
Ans: स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान वेतन, शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणे आणि प्रजनन आरोग्यावर (गर्भनिरोधक) स्वतःचा अधिकार असणे, हा मुख्य उद्देश होता.
Ans: या मोर्चात सुमारे ४,००० ते ५,००० महिला, पुरुष आणि लहान मुलांनी सहभाग घेतला होता.






