'या' कंपनीला मिळाल्या कोट्यवधींच्या ऑर्डर; शेअरने गाठला विक्रमी उच्चांक, 110 देशांमध्ये आहे व्यवसाय!
केईसी इंटरनॅशनल ही एक जागतिक पायाभूत सुविधा ईपीसी कंपनी आहे. जी आरपीजी समूहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जगातील 110 हून अधिक देशांमध्ये कंपनीचे कामकाज आहे. या कंपनीला सौदी अरेबियाकडून 1423 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. गुरुवारी (ता.५) हा शेअर सहा आणि सव्वा टक्क्यांच्या वाढीसह 990 रुपयांवर बंद झाला आहे. तर आज हा शेअर इंट्राडेमध्ये 1003 रुपयांचा नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
कोणत्या मिळाल्या आहेत कंपनीला
केईसी इंटरनॅशनलने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले की, सौदी अरेबियाकडून 380 केव्ही ट्रान्समिशन लाइनसाठी 1423 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विमल केजरीवाल यांनी सांगितले की, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्हर्टिकलमध्ये चांगले ट्रॅक्शन दिसत आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीला 11300 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 75 टक्के अधिक आहे. याआधी कंपनीला यूएई आणि ओमानमधूनही ऑर्डर मिळाल्या होत्या. सौदी अरेबियाच्या नवीन ऑर्डरमध्ये कंपनीचे मध्य पूर्वेतील मजबूत अस्तित्व दिसून येते.
कंपनीचा व्यवसाय 110 हून अधिक देशांमध्ये
केईसी इंटरनॅशनल ही जागतिक अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) कंपनी आहे. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन, सिव्हिल, रेल्वे, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल, ऑइल आणि गॅस आणि केबल सेगमेंटमध्ये काम करते. 110 हून अधिक देशांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे.
केईसी शेअर्सची बाजारातील कामगिरी
केईसी इंटरनॅशनलच्या शेअर्सने प्रथमच 1000 चा टप्पा ओलांडला आहे. गेल्या एका आठवड्यात या शेअरने सुमारे 10 टक्के, दोन आठवड्यात 20 टक्के, एका महिन्यात 19 टक्के, तीन महिन्यांत 37 टक्के, सहा महिन्यांत 36 टक्के परतावा दिला आहे आणि या वर्षात आतापर्यंत सुमारे 65 टक्के परतावा दिला आहे. एक दिवस वगळता, गेल्या 10 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरमध्ये सतत वाढ होत आहे. या वाढीमध्ये 830 रुपयांचा शेअर 1000 रुपयांवर पोहोचला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)