मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून गॅस कंपन्यांनी एजन्सींना काही सूचना दिल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडर एक महिना पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर देऊ नये तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या रत्नागिरीत केवळ तीन दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनी गॅसचा जपून वापर करावा, असे आवाहन गॅस एजन्सीकडून करण्यात आले आहे.