फोटो सौजन्य- सोशल मीडिया
अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) आज उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. ईडीकडून 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज कुंद्रावर अश्लीलता आणि मनी लाँड्रिंगसह अनेक गंभीर आरोप आहेत. 2021 मध्ये पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणात कुंद्रांना तरुंगवास ही भोगावा लागला होता. आज केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईमुळे राज कुंद्रा यांची एकूण मालमत्ता किती हा प्रश्न समोर येत आहे त्याबद्दल जाणून घेऊया
राज कुंद्रा यांचे व्यवसाय
राज कुंद्रा यांचे अनेक क्षेत्रामध्ये व्यवसाय आहेत. या व्यवसायांमध्ये सत्ययुग गोल्ड, रेस्टॉरंट चेन बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी, सुपर फाईट लीग सारख्या विविध क्षेत्रातील विविध व्यवसायांचा समावेश आहे. आयपीलमधील राजस्थान रॉयल या संघाचेही कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी मालक होते. कुंद्रांनी 2015 मध्ये एक ऑनलाइन आणि टीव्ही ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्म सुरू केला, जो एक प्रकारचा होम शॉपिंग चॅनेल होता. दरम्यान सरकारच्या स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत कुंद्राने जल्दी हे पहिले लाइव्ह स्ट्रीम सोशल मीडिया ॲप लाँच केले होते.
खाजगी जेट, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट
मीडिया रिपोर्टनुसार राज कुंद्रा यांंची एकूण संपत्ती ही 2800 कोटी रुपये आहे. त्यामध्ये त्यांचा मुंबईत बंगला आहे ज्यामध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत. कुंद्रा यांच्या परदेशातील संपत्तीमध्ये दुबईतील बुर्ज खलिफाच्या 19 व्या मजल्यावर एक फ्लॅट आहे. लंडनमधील एक लक्झरी व्हिला तसेच अनेक डुप्लेक्स अपार्टमेंट्स यांचा समावेश आहे. त्यांचे एक खाजगी जेट देखील आहे, ज्याची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे.
लक्झरी कार संग्रह
राज कुंद्रांकडे जगप्रसिद्ध आलिशान कारचा संग्रह आहे. त्यामध्ये मर्सिडीज बेंझ GL350CDI बेंटले फ्लाइंग स्पर देखील आहे, BMW i8 हायब्रिड कारचाही समावेश आहे. या आलिशान कार्सची किंमत ही कोटींच्या घरात आहेत.
शिल्पा शेट्टी यांचे उत्पन्न
राज कुंद्रा यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अनेक मोठमोठ्या ब्रॅंडच्या जाहिराती करते. मीडिया रिपोर्ट्नुसार एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी शिल्पा शेट्टी 1 कोटींहून अधिक फी घेते.शिल्पा शेट्टीने अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणुक अथवा हिस्सेदारी घेतली आहे. ब्युटी आणि बेबी ब्रँड मामा अर्थमध्ये शिल्पाने मोठा हिस्सा खरेदी केला होता. तसेच चिन्युट्रिक्स, जॉफ, याकुल, फास्ट अँड अप, बी नॅचरल आणि एचआरएल डायग्नोस्टिक अशा अनेक स्टार्टअप अथवा नामांकित कंपन्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
आयपीएलमधील सट्टेबाज प्रकरण आणि आजीवन बंदी
राज कुंद्रा यांच्यासंबंधी हे पहिले प्रकरण नाही या अगोदर त्यांच्यावर सट्टेबाजीमध्ये सहभागाचा आरोप केला गेला होता. 2013 मध्ये हे प्रकरण गाजले होते. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला दोन वर्षांसाठी आणि राजस्थान रॉयल्सचे सह-मालक राज कुंद्रा यांच्यावर क्रिकेटसंबंधी कोणत्याही अॅक्टीव्हिटीसाठी आजीवन बंदी घालण्यात आली होती.