शेख हसीना किती संपत्तीच्या आहे मालकीण; भारतात कसा चालवणार आपला खर्च, वाचा...सविस्तर!
बांगलादेश हा गेल्या काही दिवसांपासून ‘धगधगता बांगलादेश’ म्हणून ओळखला जात आहे. विद्यार्थी आंदोलनाची वाढती धग पाहता बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत, शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतला. मात्र, आता भारतात त्यांचा खर्च कसा चालणार? आलिशान गाडी, आलिशान बंगला सर्व जमीन, मालमत्ता सोडून आलेल्या शेख हसीना यांची एकूण मालमत्ता किती आहे? त्या एकूण किती संपत्तीच्या मालकीण आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्या एकूण संपत्तीबाबाबत जाणून घेणार आहोत…
किती आहे त्यांच्याकडे संपत्ती?
महिनाभरापूर्वी शेख हसीना यांचा शिपाई जहांगीर आलम याच्याकडे तब्बल 284 कोटींची संपत्ती मिळाली होती. त्यानंतर तो विदेशात फरार झाला होता. आता तुमचा मनात प्रश्न उपस्थित झाला असेल की शेख यांच्या शिपायाकडे इतकी संपत्ती सापडल्यानंतर, शेख हसीना यांच्याकडे त्यापेक्षा अधिक संपत्ती असेल. मात्र, असे नाहीये २०२४ च्या निवडणूक घोषणापत्रात शेख हसीना यांनी आपल्या निवडणूक अर्जात त्यांच्याकडे 4.36 कोटी बांगलादेशी टका अर्थात 3.14 कोटी भारतीय रुपये इतकी संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा : भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चची एक पोस्ट, अन् चर्चांना उधाण!
शेतीतून मिळते सर्वाधिक उत्पन्न
शेख हसीना यांच्या कमाईचा सर्वाधिक हिस्सा हा शेतीतून येतो. त्यांच्या नावावर एकूण ७ एकर जमीन आहे. शेतीव्यतिरिक्त त्या मस्त्यपालन व्यवसाय देखील करतात. त्यातून देखील त्यांना चांगली कमाई होते. याशिवाय त्यांनी बिझनेसमध्ये देखील त्यांनी पैसा लावला आहे. ज्यातून त्यांना 12 लाख रुपये इतकी कमाई होते. त्यांनी कापड, दूरसंचार आणि बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्यातून देखील त्यांचा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, वर्ष २०२२ मध्ये शेख हसीना यांना शेतीतून 78 लाख रुपये कमाई झाली. त्यांच्याकडे एकूण १३ लाख रुपयांचे सोने आहे. याशिवाय त्यांच्याकडे ३४ लाख बांगलादेशी टका किमतीचे प्लॉट आहेत. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, लंडनमध्ये देखील त्यांचे आलिशान घर आहे. याशिवाय अनेक देशांमध्ये त्यांची संपत्ती आहे.
राजधानी ढाका येथे त्यांची ३ कोटींची हवेली देखील आहे. एक कोटीचे एक अपार्टमेंट देखील आहे. याशिवाय हसीना यांनी सिंगापूर, दुबई येथेही मालमत्ता खरेदी केलेली आहे. त्यांच्याकडे एक 47 लाख टका किमतीची कार देखील आहे. त्यांची बरीचशी संपत्ती ही बहीण आणि मुलांच्या नावावर आहे.