टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्स या भारतातील व्यावसायिक गतीशीलतेमधील अग्रणी कंपनीने आज आतापर्यंतचे त्यांचा सर्वात प्रगत इंटरसिटी प्लॅटफॉर्म नवीन टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच केले. लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतूकीमध्ये नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले LPO 1822आरामदायीपणा, कामगिरी आणि कार्यक्षमतेमधील अग्रणी झेप आहे, ज्यासह मास मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्यामध्ये टाटा मोटर्सचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे.
टाटा LPO 1822 फुल-एअर सस्पेंशन आणि कमी एनव्हीएच (नॉइज, व्हायब्रेशन व हार्शनेस) पैलूंच्या माध्यमातून सर्वोत्तम राइड अनुभव देते, ज्यामधून प्रवाशांना व ड्रायव्हर्सना थकवा न येता प्रवासाचा आनंद मिळतो. ३६ ते ५०-आसनीपर्यंतचे स्थिर कॉन्फिग्युरेशन्स आणि स्लीपर लेआऊट्ससह चेसिस भारतातील विस्तारित होत असलेल्या परिवहन क्षेत्रामधील ताफा ऑपरेअर्सच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
काय म्हणाले उपाध्यक्ष
या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस. म्हणाले,
”भारतातील इंटरसिटी परिवहन परिसंस्थेमध्ये परिवर्तन होत आहे, ज्याचे श्रेय वाढती कनेक्टीव्हीटी आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांना जाते. टाटा LPO 1822 प्रगत उत्पादन आहे, ज्यामध्ये उच्च राइड दर्जा, प्रबळ रचना आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत, जी अद्वितीय मूल्य देतात. प्रवासी, ड्रायव्हर्स आणि ताफा मालकांसाठी हे लाभदायी आहे, जेथे आरामदायीपणामध्ये वाढ करण्यात आली आहे, सुरक्षितता वाढवण्यात आली आहे अणि अधिक लाभाची खात्री मिळते.”
काय आहेत वैशिष्ट्य
LPO 1822 मध्ये प्रमाणित 5.6-लीटर कमिन्स डिझेल इंजिनची शक्ती आहे, जे प्रभावी 220 एचपी शक्ती आणि 925 एनएम टॉर्क देते. ही पॉवरट्रेन उच्च कामगिरी व इंधन कार्यक्षमतेमध्ये संतुलन राखते. चेसिस पूर्णपणे डिझाइन करण्यात आलेल्या टाटा मॅग्ना कोचसाठी आधार म्हणून देखील काम करते. टाटा मॅग्ना कोच ही प्रीमियम इंटरसिटी बस असून दर्जात्मक सुरक्षितता, आरामदायीपणा व प्रवास अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
मूल्य तत्त्व अधिक वाढवत LPO 1822 टाटा मोटर्सच्या नेक्स्ट जनरेशन कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजच्या पूरक चार वर्षांच्या सबस्क्रिप्शनसह येते. फ्लीट एज ऑपरेटर्सना रिअल-टाइम डायग्नोस्टिक्स, अंदाजात्मक देखभाल आणि डेटा-संचालित फ्लीट ऑप्टिमायझेशनसह सक्षम करते, ज्यामधून स्मार्ट, अधिक लाभदायी कार्यसंचालनांची खात्री मिळते.
Tata Motors च्या ‘या’ 3 एसयूव्ही भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी गेम चेंजर ठरणार, किंमत तर अगदी स्वस्त
कसे आहेत मॉडेल्स
डिझेल, सीएनजी, एलएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्समध्ये ९ ते ५५-आसनी मॉडेल्सपर्यंत पसरलेल्या सर्वसमावेशक पोर्टफोलिओसह टाटा मोटर्स भविष्यासाठी सुसज्ज गतीशीलता सोल्यूशन्स देण्यामध्ये नेतृत्व करत आहे. या सुविधेला सर्वांगीण वेईकल लाइफसायकल सपोर्ट प्रोग्राम Sampoorna Seva 2.0 चे पाठबळ आहे, जो खात्रीदायी सर्विस टर्नअराऊंड, जेन्यूएन स्पेअर्स, वार्षिक देखभाल करार आणि २४x७ ब्रेकडाऊन असिस्टण्स देतो. देशभरात 4,500 हून अधिक सेल्स व सर्विस टचपॉइट्सच्या प्रबळ नेटवर्क पाठबळासह टाटा मोटर्स भारताातील प्रवासी परिवहन क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहे.