IVF बाबत संपूर्ण माहिती (फोटो सौजन्य - iStock)
अनेक जोडप्यांसाठी आयव्हीएफ सुरू करण्याचा निर्णय जितका भावनिक असतो तितकाच तो आर्थिकही असतो. तरीही बरेचदा याबाबत जाणवणारी चिंता खुद्द उपचारांबद्दलची नसते, तर सांगण्यात आलेल्या रकमेमध्ये प्रत्यक्षात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याभोवती असलेल्या अनिश्चितेबद्दल असते. मात्र क्लिनिक्स जेव्हा एकूण खर्चाचा सल्ला, निदानात्मक चाचण्या, औषधे, चाचण्या, एब्र्यो कल्चर आणि ऐच्छिक प्रक्रिया या सर्वांचा समावेश असलेली स्वच्छ विभागणी, अर्थात कॉस्ट ब्रेकडाऊन पुरवितात तेव्हा ही गुंतागूंतीची गोष्ट एका पारदर्शी आणि हाताळता येण्याजोगी बाब बनून जाते असे बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफ, नागपूर येथील फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. प्रमोद मधुकर येरणे यांनी स्पष्टपणे सांगितले.
खर्चाबाबतची पारदर्शकता ही केवळ आर्थिक सुस्पष्टतेपुरतीच मर्यादित नसते तर विश्वास आणि आत्मविश्वासाची उभारणी करण्यातही तिचे योगदान असते. खर्चातील प्रत्येक घटकाचे योगदान किती हे जोडप्यांना नेमकेपणाने माहीत असेल तर क्लिनिक्समध्ये केवळ किंमतीच्याच नव्हे तर वैद्यकीय गुणवत्तेच्या निकषावर तुलना करण्यासाठी गरजेचा दृष्टिकोन त्यांना लाभतो. तसेच यामुळे एम्ब्र्यो फ्रीझ करण्याचा टप्पा यात समाविष्ट आहे किंवा नाही, योजनेअंतर्गत ते किती काळ गोठवून ठेवता येईल इत्यादी अर्थपूर्ण विषयांवरील चर्चेला वाव मिळतो.
World IVF Day: आयव्हीएफला सुरुवात करण्याआधी मानसिक तयारी किती गरजेचे, तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स
नव्या तंत्रज्ञानाची भर
नेहमीच्या प्रमाण आयव्हीएफ प्रक्रियांच्या पर्यायांमध्ये आता अनेक नवनव्या प्रगत तंत्रांची भर पडली आहे व यशस्वीतेचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांची शिफारस केली जाते. यात आयसीएसआय (इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन), ब्लास्टोसिस्ट कल्चर, लेझर-असिस्टेड हॅचिंग आणि एम्ब्र्यो ग्लू यांचा समावेश होतो. गुंतागूंतीच्या प्रकरणांमध्ये अधिक चांगल्या परिणामांसाठी स्पर्म डीएनए फ्रॅग्मेंटेशन (डीएफआय), मायक्रोफ्लुईडिक्स स्पर्म सिलेक्शऩ आणि इंट्रायुटेराइऩ प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (पीआरपी)चाही निवडकपणे वापर केला जात आहे. या सेवा काय आहेत हे समजून घेतल्याने व आयव्हीएफ पॅकेजमध्ये त्यांचा समावेश आहे का हे माहीत करून घेतल्याने रुग्णांना संभाव्य फायद्यांचे मूल्यमापन करण्यास मदत होते.
कसे असते IVF
असे असले तरीही केवळ आयव्हीएफची किंमत करणे ही समीकरणाची एकच बाजू आहे. कोणत्या गोष्टी उपचारांच्या परिणामांना मोजता येण्याजोगे मूल्य प्रदान करतात हे समजून घेण्यामध्ये खरी सक्षमता सामावलेली आहे. आयव्हीएफच्या यशस्वीतेच्या प्रमाणात आमूलाग्र बदल करून आणणाऱ्या नवीनतम सुधारणेमध्ये एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी टेस्टिंग (ईआरटी)चा समावेश होतो, ज्याचा वापर बरेचदा पर्सनलाइझ्ड एम्ब्र्यो ट्रान्सफरबरोबर (पीईटी) एकत्रितपणे केला जातो.
अगदी सुदृढ भ्रूणही स्त्रीच्या ‘विंडो ऑफ इम्प्लान्टेशन’ म्हणविल्या जाणाऱ्या विशिष्ट कालावधीच्या आगेमागे इम्प्लान्ट होत नाही म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराला चिकटत नाही.
एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी टेस्टिंग (ईआरटी)मध्ये ही इष्टतम वेळ कोणती हे ओळखण्यासाठी गर्भाशयाच्या अस्तरातील जीन एक्स्प्रेशनचे विश्लेषण केले जाते. इम्प्लान्टेशन वारंवार अपयशी ठरत असल्यास, अशा महिलांच्या बाबतीत ईआरटीच्या माध्यमातून वेळ समायोजित करून भ्रूण गर्भाशयात ठेवले गेल्यास इम्प्लान्टेशनच्या परिणामांत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे अभ्यासांतून दिसून आले आहे.
World IVF Day: आयव्हीएफ म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती
किमतीचा फरक
इथेच किंमतीच्या पारदर्शी रचनेमुळे अधिकच फरक पडतो. रिसेप्टिव्हिटी टेस्टिंगसारख्या अतिरिक्त प्रक्रियांचे महत्त्व, त्याची शिफारस केली जाण्यामागची कारणे रुग्णाला माहीत असतील तर त्यांना वैद्यकीय अचूकता आणि विनाकारणाचा खर्च यांत फरक करणे शक्य होईल.
अंतिमत: आयव्हीएफच्या खर्चाचे विभाजनाचा उपयोग केवळ बिलातल्या विविध घटकांच्या स्वतंत्र किंमती माहिती करून घेण्यापुरता मर्यादित नाही तर त्यातून एक संपूर्ण माहितीनिशी निर्णय घेणारा, आत्मविश्वासपूर्ण रुग्ण घडविला जातो. जेव्हा आर्थिक पारदर्शकता आणि वैज्ञानिक एकात्मतेच्या समसमान असते, तेव्हा फर्टिलिटी केअर खऱ्या अर्थाने वैयक्तिकृत बनते; जिला माहिती, सहानुभाव आणि विश्वासाचे मार्गदर्शन लाभलेले असते.