लिम्काने आर्थिक वर्षात २८०० कोटी रूपयांचा महसूल केला जमा, कोका-कोलाचा काय आहे प्लॅन? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लिम्का या कोका-कोला इंडियाच्या आयकॉनिक स्वदेशी बेव्हरेजने आर्थिक वर्ष २४ मध्ये २८०० कोटी रूपये महसूलाचा टप्पा पार केला आहे, ज्यामुळे भारतभरात उत्तम गतीसह लेमन-लाइम श्रेणीच्या प्रगतीला चालना मिळाली आहे. पाच दशकांहून अधिक काळापासून लिम्का सिग्नेचर क्लाऊडी बबल्स आणि स्वादिष्ट लाइम ‘एन’ लेमनी चवीसह उन्हाळ्यातील रिफ्रेशमेंटचे अल्टिमेट बेव्हरेज राहिले आहे.
१९७१ मध्ये लाँच झाल्यापासून लिम्का कंपनीच्या सर्वोत्तम पोर्टफोलिओला प्रबळ करण्यामध्ये प्रेरक शक्ती राहिला आहे, तसेच शहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्ये मागणी वाढत आहे. आज, ब्रँड दिल्ली, पंजाब व हरियाणा यांसारख्या प्रमुख राज्यांमध्ये प्रबळ दोन-अंकी वाढ करत आहे. याव्यतिरिक्त, समकालीन ट्रेड आणि उदयोन्मुख रिटेल प्रकारांमध्ये हिस्सा संपादित करत आहे.
लिम्काच्या अविरत यशामागील प्रमुख बाब म्हणजे ब्रँडच्या नाविन्यपूर्ण मोहिमा, ज्या ब्रँडला समकालीन ठेवण्यासोबत ब्रँडच्या वारसाला साजरे करतात. २०२५ मध्ये, लिम्काने तृप्ती डिमरी सोबतच्या मोहिमेसह रिफ्रेशमेंटच्या नवीन युगामध्ये प्रवेश केला. लिम्काच्या सिग्नेचर लाइम ‘एन’ लेमनी रिफ्रेशमेंटवर नवीन टेकसह या मोहिमेने ग्राहकांना मोहकता आणि उत्साहित करणाऱ्या क्षणांचा पुन्हा शोध घेण्याचे आवाहन केले, जे फक्त लिम्काचा आस्वाद घेत मिळू शकते.
कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाच्या डेव्हलपिंग मार्केट्सच्या फ्रँचायझी ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष विनय नायर म्हणाले, ”आमचे उत्पादनापलीकडे जाणारे, दैनंदिन जीवन व सहयोगात्मक आठवणीचा भाग बनणारे ब्रँड्स निर्माण करण्याचे नेहमी ध्येय राहिले आहे. लिम्काच्या गाथेमधून स्थिरता, नवीन शोध आणि सर्वोत्तमतेप्रती प्रयत्न दिसून येतात. आमचे यश साध्या, पण प्रबळ तत्त्वामध्ये सामावलेले आहे, ते म्हणजे ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करणाऱ्या उत्पादनांमध्ये नाविन्यता आणणे, भारतातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये वितरण विस्तारित करणे आणि आवड व उद्देशाशी जुळणाऱ्या विपणन मोहिमा राबवणे. आम्हाला ही गती सुरू ठेवण्याचा आणि लाखो ग्राहकांना दीर्घकालीन मूल्य वितरित करण्याचा आनंद होत आहे.
भारतीयांच्या जीवनशैलीमध्ये बदल होत असताना लिम्कामध्ये देखील बदल होत आहे. २०२४ मध्ये, लिम्काने लिम्का ग्लुकोचार्ज लाँच करत प्रगत हायड्रेशन श्रेणीमध्ये प्रवेश केला. ग्लुकोज व इलेक्ट्रोलाइट्स असलेले हे खास बेव्हरेज आजच्या काळातील सक्रिय ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेता नीरज चोप्रा सामील असलेल्या या लाँच कॅम्पेनने लाखो ग्राहकांना चिकाटीच्या संदेशासह प्रेरित केले, जो अॅथलीट्स व दैनंदिन जीवनातील हिरोंशी संलग्न आहे.
सर्वोत्तमतेप्रती ही कटिबद्धता फक्त क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नाही. यामधून लिम्काचे मूळ तत्त्व दिसून होते. ब्रँडचा नेहमी भारतीयांचे असाधारण यश सन्मानित व साजरे करण्यावर विश्वास आहे. हा विश्वास ब्रँडच्या तत्त्वाचे विस्तारीकरण म्हणून १९९० मध्ये लाँच करण्यात आलेल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समधून दिसून येतो. क्रीडामधील असमान्य उपलब्धी असो किंवा कलात्मक यश असो हे बुक देशातील नागरिकांना मोठे स्वप्न पाहण्यास प्रेरित करत आहे.
लिम्का नाविन्यता आणण्यासोबत भावी पिढ्यांशी कनेक्ट होत असताना भारतातील सर्वात लोकप्रिय लेमन-लाइम बेव्हरेज म्हणून ब्रँडचा वारसा कायम दृढ होत आहे, विकासाला गती देत आहे आणि देशभरातील लाखो व्यक्तींना उत्साहित करत आहे.