Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liquor Ban: दारु मिळणारच नाही… Old Monk सह ‘या’ ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी! प्रशासनाने अचानक का घेतला निर्णय?

Liquor Ban: मद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय प्रसिद्ध दारूच्या ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासनाने परवानग्यांचे नूतनीकरण, कर थकबाकी आणि गुणवत्ता निकषांशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही मोठी कारवाई केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 05:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दारु मिळणारच नाही… मद्यप्रेमींना दणका!
  • Old Monk सह ‘या’ ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी!
  • प्रशासनाने अचानक का घेतला निर्णय?
Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. काही लोकप्रिय ब्रँड्सच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा नियामक एफएसएसआयने ओल्ड मॉन्क सह अनेक सुप्रसिद्ध मद्य ब्रँड्सच्या काही प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. काही काळापासून Old Monk बाजारात उपलब्ध नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता Old Monk सोबतच मद्यप्रेमींच्या आवडीचे काही ब्रँड मार्केटमध्ये मिळणं पूर्णपणे बंद ( Liquor Ban ) झाले आहेत. सरकराने बंदीचा पवित्रा वापरला आहे. नेमकं काय घडलं ज्यामुळे सरकारला हा अचानक इतका मोठा निर्णय घ्यावा लागला? नेमकं काय आहे प्रकरण ? सविस्तर समजून घेऊयात.

Haldiram London Restaurant : भारतातील प्रसिद्ध हल्दीराम लंडनमध्ये फेल? अवघ्या 25 दिवसांत शटर डाऊन, मोठं कारण समोर

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हणजेच FSSAI ने हे स्पष्ट केलंय की, त्यांच्या तपासणीत असे आढळून आले आहे की, डायजिओ इंडियाच्या युनायटेड स्पिरिट्स, इनब्रू बेवरेजेस आणि मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या काही उत्पादनांमध्ये, नैसर्गिक घटक आणि योग्य परिपक्वता प्रक्रिया वापरण्याऐवजी, अल्कोहोलची चव आणि सुगंध निर्माण करण्यासाठी बाह्य कृत्रिम किंवा नैसर्गिक स्वादांचा वापर केला गेला होता.

कोणत्या ब्रँडचा समावेश?

ओल्ड मॉन्क, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स व्हिस्की यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध मद्य ब्रँडच्या विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, कारण त्यांमध्ये स्थापित उत्पादन मानकांची पूर्तता न करणारे कृत्रिम स्वाद आढळून आले आहेत.

विक्री कुठे थांबवण्यात आली?

रेगुलेटरने मध्य प्रदेशातील युनायटेड स्पिरिट्सने बनवलेल्या अँटिक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, तसेच इनब्रू बेवरेजेसने बनवलेल्या बॅगपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रम यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरने बनवलेल्या ओल्ड मॉन्कच्या तीन प्रकारांवरही बंदी घालण्यात आली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही कारवाई केवळ या विशिष्ट ठिकाणी उत्पादित केलेल्या उत्पादनांना लागू होते की इतरत्र उत्पादित केलेल्या तत्सम ब्रँड्सनाही लागू होते, हे अजूनपर्यंत काही स्पष्ट झालेले नाही.

लॅबमध्ये धक्कादायक खुलासा

रेगुलेटच्या मते, भारतातील अन्न सुरक्षा नियमांनुसार मद्यपेयांमध्ये नैसर्गिक स्वादवर्धकांचा वापर करण्यास परवानगी आहे. पण FSSAI च्या प्रयोगशाळेतील निष्कर्षांनुसार, कंपन्या मद्याच्या काही ब्रँड्समध्ये स्वादवर्धक मिसळत आढळून आली आहे.जसे की रममध्ये रम फ्लेवरिंग किंवा व्हिस्कीमध्ये व्हिस्की फ्लेवरिंग. भारतीय नियमांनुसार अशा स्वादवर्धकांच्या वापरास परवानगी नाही त्यामुळे यावर कारवाई करण्यात आली आहे.

भारतात मद्यप्रेमींची संख्या बरीच मोठी

भारत जगातील सर्वात मोठ्या मद्य बाजारपेठांपैकी एक आहे, ज्याचा वार्षिक उद्योग महसूल अंदाजे ४० अब्ज डॉलर्स आहे. डियाजिओ इंडिया, युनायटेड स्पिरिट्सच्या माध्यमातून, बाजारपेठेतील हिश्श्यानुसार देशातील सर्वात मोठी मद्य कंपनी असून, ती फ्रेंच मद्य क्षेत्रातील दिग्गज कंपनी पर्नोड रिकार्डला टक्कर देते. FSSAI च्या देखरेखेखाली असलेले मद्याचे ब्रँड देशांतर्गत उत्पादित आहेत, त्यामुळे त्यांची किंमत आयात केलेल्या व्हिस्की, स्कॉच आणि प्रीमियम रमपेक्षा कमी आहे आणि म्हणूनच, त्यांचा वापर अधिक प्रमाणात होतो. ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा FSSAI सध्या अन्न आणि पेयांची कठोर तपासणी करत आहे.

Flipkart Food Delivery: आता Swiggy-Zomato ची खैर नाही… फक्त 10% कमीशनवर फूड डिलीवर करणार Flipkart, जेवण स्वस्त मिळणार?

Web Title: Liquor ban old monk bagpiper rc liquor brand know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Business News
  • FSSAI
  • liquor
  • Liquor Ban
  • Liquor Sales
  • Liquor Scam
  • liquor shops
  • Marathi News

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.