Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! आता ‘या’ वाहनधारकांना भरावा लागणार दुप्पट कर! महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2026 | 06:16 PM
मोठी बातमी! आता ‘या’ वाहनधारकांना भरावा लागणार दुप्पट कर! महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मोठी बातमी! आता ‘या’ वाहनधारकांना भरावा लागणार दुप्पट कर! महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ वाहनधारकांना भरावा लागणार दुप्पट कर
  • महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर
  • वाहनांवरील पर्यावरण करात वाढ
मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे “महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६” आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर ₹२,००० वरून ₹४,०००, पेट्रोल वाहनांसाठी ₹३,००० वरून ₹६,०००, तर डिझेल वाहनांसाठी ₹३,५०० वरून ₹७,००० करण्यात आला आहे. हा कर दर पाच वर्षांसाठी एकरकमी आकारला जाणार आहे.

या सुधारित कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी सुमारे ₹१६० कोटींपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार असून हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच, औद्योगिक क्षेत्राला दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार वाहन करासाठी ₹३० लाखांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Mahavitaran News: महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता घरात बसून होणार खंडित

विधेयकामुळे नागरिकांना बीएस-६ आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळणार असून राज्याच्या पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळेल. याशिवाय ग्रामीण आणि आदिवासी भागात दरवर्षी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून उलट महसूल वाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजुरी दिली, त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

दरम्यान,महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम, २०२५ अंतर्गत कर दरांमध्ये सुधारणा केली. २०-३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कार आणि सीएनजी वाहनांवरील करांमध्ये १% ते २% वाढ करण्यात आली आहे, जी १ जुलै २०२५ पासून लागू होईल. आता कर १० लाख रुपयांपर्यंत ११%, १०-२० लाख रुपयांसाठी १२% आणि २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीसाठी १३% (डिझेलसाठी १५%) असेल.

Jogeshawari SRA News: जोगेश्वरीतील ‘एसआरए’ प्रकल्पाची १५ दिवसांत चौकशी; मंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

Web Title: Maharashtra motor vehicles tax amendment bill 2026 passed unanimously read in detailed news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • automobile news
  • maharashtra
  • tax

संबंधित बातम्या

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
1

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
2

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
3

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
4

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.