Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 35000 कोटींची Mega Investment; Rashmi Group करणार स्टील, खाणकाम आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक

'रश्मी ग्रुप'ने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये मोठी घोषणा केली. कंपनीने पोलाद, ऊर्जा आणि खाणकाम या क्षेत्रांमध्ये ३५,००० कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणूक करण्याची घोषणा करत मोठा निर्णय घेतला आहे. एका निवेदनात, त्यांनी हे स्पष्ट केलं की, आपली लोह आणि पोलाद उत्पादन क्षमता दरवर्षी अतिरिक्त 7 दशलक्ष टनांनी वाढवण्याची गरज आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 30, 2026 | 01:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rashmi Group Mega Investment : ‘रश्मी ग्रुप’ने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये मोठी घोषणा केली. कंपनीने पोलाद, ऊर्जा आणि खाणकाम या क्षेत्रांमध्ये ३५,००० कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणूक करण्याची घोषणा करत मोठा निर्णय घेतला आहे. एका निवेदनात, त्यांनी हे स्पष्ट केलं की, आपली लोह आणि पोलाद उत्पादन क्षमता दरवर्षी अतिरिक्त 7 दशलक्ष टनांनी वाढवण्याची गरज आहे. यासाठी ३०,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर बीरभूम आणि पश्चिम बर्धमान जिल्ह्यांमध्ये संपादित करण्यात आलेल्या तीन कोळसा खाणी कार्यान्वित करण्यासाठी आणखी ५,००० कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

‘या’ राज्यांमध्ये 1 जूनपासून Petrol-Diesel बंद, VAT कमी करण्यासह सरकारकडे मागण्या, नाहीतर संप पुकारण्याची तयारी

तेलंगणा सरकारसोबत सामंजस्य करार स्वाक्षरित

जानेवारीमध्ये, या समूहाने तेलंगणा सरकारसोबत १२,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार स्वाक्षरित केला. पण पश्चिम बंगालमधील प्रस्तावित विस्तारांबाबत कंपनीने प्रकल्पांचे सविस्तर तपशील, त्यांची नेमकी ठिकाणे, जमिनीची आवश्यकता किंवा अंमलबजावणीच्या सुधारित योजना अजूनही उघड केलेल्या नाहीत.

पुरुलिया जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक

ऑक्टोबर २०२५ मध्ये, रश्मी समूहाने पुरुलिया जिल्ह्यात १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून २.८ दशलक्ष टन क्षमतेचा Integrated Steel Plant आणि त्यासोबतच ४०० मेगावॅटचा ‘कॅप्टिव्ह पॉवर प्रोजेक्ट’ उभारण्याची योजना जाहीर केली होती. तत्कालीन राज्य सरकारनेदेखील या प्रकल्पासाठी सुमारे ९३८ एकर जमीन मंजूर केली होती. पण नुकत्याच करण्यात आलेल्या घोषणेमध्ये, पुरुलियाबाबतचा तो आधीचा प्रस्ताव ३५,००० कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणूक आराखड्याचाच एक भाग आहे की नाही; अथवा प्रकल्पाची रचना, जमिनीचे वाटप किंवा कालमर्यादेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

कोणत्या राज्यांचा समावेश?

संस्थेने सांगितले की, नवीन गुंतवणुकीच्या या योजनांमध्ये पुरुलिया, पश्चिम बर्धमान, बीरभूम, झाडग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर या जिल्ह्यांचा समावेश असेल. कंपनीने दावा केला की, केवळ पोलाद उत्पादन क्षमतेच्या विस्तारातूनच सुमारे ३५,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे; तर कोळसा खाण प्रकल्पांतून आणखी १५,००० रोजगार निर्माण होऊ शकतात. याबाबत समुहाने स्पष्ट केलंय की, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीच सुमारे २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या या राज्यात त्यांचा १० MTPA क्षमतेचा पोलाद प्रकल्प, ८५० MW क्षमतेचा ‘कॅप्टिव्ह’ वीज प्रकल्प आणि १.४५ MTPA क्षमतेचा सिमेंट उत्पादन कारखाना कार्यरत आहे.

प्रस्तावित गुंतवणूक ही राज्याच्या भविष्याबद्दल गाढ विश्वास

रश्मी ग्रुप’चे संयुक्त अध्यक्ष लाल बाबू चौरसिया म्हणाले की, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे राज्य एक आशादायक औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. “आमची प्रस्तावित गुंतवणूक ही राज्याच्या भविष्याबद्दल आम्हाला वाटणारा गाढ विश्वास, तसेच शाश्वत औद्योगिक प्रगती, रोजगार निर्मिती आणि दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासाप्रती असलेली आमची अटूट कटिबद्धता दर्शवते,” असे त्यांनी नमूद केले.

Ayushman Bharat: 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार हवेत? घरबसल्या अवघ्या 2 मिनिटांत डाऊनलोड करा ‘आयुष्मान कार्ड’

Web Title: Massive mega investment of 35000 crore rashmi group to make major investments in steel mining and energy projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Steel Plant

संबंधित बातम्या

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता
1

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
2

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी
3

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई
4

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.