Climate Innovation News: हवामान बदलावर उपाय शोधणाऱ्यांसाठी नवे व्यासपीठ खुले, MCW 2026 इनोव्हेशन चॅलेंज लाँच
Climate Innovation News: भारतातील हवामान नाविन्यता परिसंस्था प्रबळ करण्याच्या दिशेने मोठा पुढाकार घेत मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू)ने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)सोबत सहयोगाने आज एमसीडब्ल्यू २०२६ इनोव्हेशन चॅलेंजच्या लाँचची घोषणा केली आहे. हा प्रमुख प्लॅटफॉर्म भारतातील शाश्वत विकास प्राधान्यक्रमांशी संलग्न राहत हवामान बदलाबाबत उच्च-प्रभावी उपाययोजनांना ओळखण्यासाठी, त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि गती देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
इनोव्हेशन चॅलेंज स्टार्टअप्स, नागरी समाज, शैक्षणिक संस्था आणि ग्लोबल साऊथमधील व्यापक हवामान परिसंस्थेमधील सुरूवातीच्या टप्प्यामधील, विकासासाठी सुसज्ज असलेल्या व क्षेत्रावर लक्ष केंद्रित असलेल्या नवप्रवर्तकांना एमसीडब्ल्यूच्या तीन मुलभूत थीम्सशी संलग्न राहत सर्वोत्तम सोल्यूशन्ससह अर्ज करण्याचे आवाहन करते. एमसीडब्ल्यूच्या तीन मूलभूत थीम्स आहेत अन्न यंत्रणा, शहरी स्थिरता आणि ऊर्जा परिवर्तन. या चॅलेंजचा विकासात्मक, समान व गुंतवणूकीसाठी सुसज्ज नाविन्यता सादर करण्याचा मनसुबा आहे, जे अस्थिर हवामान बदलाचे निराकरण करतात, तसेच भारताच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाप्रती योगदान देतात.
शॉर्टलिस्ट करण्यात आलेले नवप्रवर्तक संरचित व प्रखर मूल्यांकन प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे वाटचाल करतील, ज्यामध्ये अर्जाची तपासणी, तज्ञ ज्यूरी फेऱ्या, थीमॅटिक सहयोगींकडून मार्गदर्शन व अॅक्सेलरेशन क्लिनिक्स आणि १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या मुंबई क्लायमेट वीक २०२६ दरम्यान अंतिम टप्प्यामधील प्रेझेन्टेशन्स यांचा समावेश असेल. निवडण्यात आलेल्या नवप्रवर्तकांना एक्स्चेंज-सहाय्यक प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून अधिक दृश्यमानता आणि एमसीडब्ल्यूचा सर्वोत्तम गुंतवणूकदार ‘स्पीड-सीडिंग’ सत्रांची उपलब्धता यामधून देखील फायदा होईल, ज्यामुळे ते गुंतवणूकदार, परिसंस्था सहयोगी आणि सक्षमकर्त्यांशी संलग्न होतील.
हेही वाचा: Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी घसरले, FII खरेदी असूनही बाजार घसरतोय? जाणून घ्या कारणे
या लाँचबाबत मत व्यक्त करत एनएसईचे एमडी व सीईओ श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, ”एनएसईने मुंबई क्लायमेट वीकसोबत सहयोगाने क्लायमेट इनोव्हेशन प्रोग्राम लाँच केला आहे, जो आधुनिक काळातील क्लायमेट स्टार्टअप्सना परिवर्तनात्मक संकल्पना प्रकाशझोतात आणण्याचे कृतीशील आवाहन आहे, जेथे या संकल्पना भारताच्या हरित भविष्याला आकार देऊ शकतात आणि स्टार्ट-अप्स भावी भांडवल बाजारपेठेसाठी सुसज्ज उद्योग बनू शकतात. एनएसईने आपल्या प्रवासामध्ये नेहमी प्रॉडक्ट इनोव्हेशनला प्राधान्य दिले आहे.
इलेक्ट्रिसिटी फ्यूचर्स, ईएसजी डेब्ट सिक्युरिटीज यांसारखी साधने लाँच करण्यापासून ऊर्जा बाजारपेठेसाठी कॉन्ट्रॅक्ट्स फॉर डिफरन्स (सीएफडी), ग्रीन इक्विटी क्रायटेरिया आणि सोशल अँड डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉण्ड्स सारखे भावी बाजारपेठ सोल्यूशन्स डिझाइन करण्यापर्यंत आम्ही भांडवल बाजारपेठांमध्ये शाश्वततेचा समावेश करत आहोत, तसेच या बाजारपेठांना भारतातील क्लायमेट फायनान्ससाठी गेटवे म्हणून स्थित करत आहोत. आगामी वर्षांमध्ये असे उद्योग व साधने वर्ष भारताचे २०७० पर्यंत निव्वळ शून्य ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या जवळपास १०.९ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स क्लायमेट फायनान्सची पूर्तता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. या प्रयत्नांच्या माध्यमातून एनएसई सार्वजनिक बाजारपेठा डिझाइन करत आहेत, ज्या विकासाला चालना देण्यासोबत भविष्यासाठी अधिक स्थिर, कमी कार्बन व सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेसाठी मार्ग देखील निर्धारित करतील.
हेही वाचा: EMC 2.0 Investment: ईएमसीमध्ये १.४६ लाख कोटींची गुंतवणूक, देशात १.८० लाख नोकऱ्या होणार निर्माण
याप्रसंगी मत व्यक्त करत प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व सीईओ शिशिर जोशी म्हणाले, ”मुंबई क्लायमेट वीक मुलभूतरित्या भारतातील हवामान बदलाबाबत सोल्यूशन्ससाठी स्थिती निर्माण करण्याबाबत, नाविन्यता प्रभावी बनेल अशा पायाभूत सुविधा डिझाइन करण्याबाबत आहे. एनएसईसोबत सहयोग करत आम्ही भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण क्लायमेट विचारवंतांना विकासासाठी आवश्यक असलेले भांडवल व प्लॅटफॉर्म्स मिळवून देत आहोत. एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंजच्या माध्यमातून आम्ही प्रखर, विश्वसनीय प्लॅटफॉर्म डिझाइन करत आहोत, जो भारतातील व ग्लोबल साऊथमधील सर्वोत्तम नाविन्यतांना समाविष्ट करतो, ज्यांचे प्रभावी क्षमतेसाठी दर्जा, नाविन्यता आणि विकास करण्याच्या क्षमतेसह मूल्यांकन करण्यात आले आहे. यामुळे हवामान बदलाबाबत महत्त्वाकांक्षांना स्पर्धात्मक फायद्यामध्ये आणण्यात येत आहे, जेथे हवामान बदलासंदर्भात कृती आर्थिक व सामाजिक प्रगतीचे स्रोत बनू शकते, तसेच भारत ग्लोबल साऊथ क्लायमेट इनोव्हेशनसाठी लाँचपॅड म्हणून स्थापित होईल.”
PROD joins MCW to help shape the narrative, document impact and create citizen-focused experiences like the Climate Wall and Storytelling Workshop. Join us 17–19 Feb 2026. https://t.co/Xj4dGz4TaC pic.twitter.com/YHtID8fFuY — Mumbai Climate Week (@Mumbai_Climate) December 16, 2025
इनोव्हेशन चॅलेंज सुरूवातीच्या टप्प्यामधील आणि विकासासाठी सुसज्ज असलेल्या नवप्रवर्तकांसाठी खुले आहे, जेथे ग्लोबल साऊथ प्रासंगिकता, हवामानाचा प्रभाव, नाविन्यता दर्जा, इक्विटी व सर्वसमावेशकता आणि विकासावर प्रबळ भर देण्यात आला आहे. फक्त पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या संपूर्ण अर्जांचे मूल्यांकन केले जाईल. ग्लोबल नॉर्थकडील कंपन्या निरीक्षक किंवा टेक्निकल योगदानकर्ते म्हणून सहभाग घेऊ शकतात, पण निवडीसाठी पात्र ठरणार नाहीत.
एमसीडब्ल्यू २०२६ इनोव्हेशन चॅलेंजसाठी अर्जप्रक्रिया १२ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली आहे, तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १० जानेवारी २०२६ आहे. शॉर्टलिस्ट करण्यात येणाऱ्या अर्जदारांची जानेवारी २०२६ च्या अखेरपर्यंत घोषणा करण्यात येईल, ज्यानंतर ज्यूरी पिच फेऱ्या व मार्गदर्शन सत्रे असतील, त्यानंतर मुंबई क्लायमेट वीकदरम्यान अंतिम सादरीकरण होईल.
यूआरएल: Mumbai Climate Week
एक्स: @Mumbai_Climate
यूट्यूब: MumbaiClimateWeek
लिंक्डइन: Mumbai Climate Week
फेसबुक: Mumbai Climate Week






