
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दुधाच्या दरात तब्बल ९ रुपयांची वाढ होणार आहे. ही घोषणा नुकतीच दूध उत्पादक संघटनेने केली आहे. या दरवाढीमुळे मुंबईतील दुधाच्या सध्यााचा घाऊक दर 93 रुपये प्रति लिटरवरुन थेट 102 रुपये प्रति लिटर होणार आहे.
दुग्धजन्य जनावरांच्या वाढत्या किमती आणि पशुखाद्याच्या दरातील वाढ पाहता ही भाव वाढ करणअयात आली असल्याचा मुंबई दूध उत्पादक संघटनेने हा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष चंद्र कुमार सिंह यांनी स्पष्ट केलं की, हे नवीन दर मुंबईत १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहतील. जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर हॉलमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संघटनेच्या झालेल्या बैठकीत असं सांगण्यात आलं की, दुभत्या जनावरांच्या वाढत्या किमतींबरोबर त्यांच्या खाद्याचेही दर वाढत आहेत. धान्य, डाळी आणि हरभरा यांसारख्या पशुखाद्याच्या किमतीतही २५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच, पशुखाद्य, पेंड आणि इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे दूध उत्पादकांवर आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता आता दुधाच्या दरात प्रति लिटर ₹९ ने वाढ केली आहे आहे. त्यामुळे आता दूधाचे दर ₹१०२ रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबई दूध उत्पादक संघटनेने स्पष्ट केले आहे की, दूध उत्पादकांना वाढत्या खर्चातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
| दुधाचा प्रकार | अर्धा लिटर | एक लिटर |
|---|---|---|
| फुल क्रीम दूध (Amul Gold / Mother Dairy Full Cream)) | ₹३६ | ₹७२ |
| टोन्ड दूध (Amul Taaza / Mother Dairy Toned) | ₹२९ – ₹३० | ₹५८ – ₹६० |
| गाईचे दूध (Amul Cow Milk / Mother Dairy Cow Milk) | ₹३१ – ₹३२ | ₹६२ – ₹६४ |
| डबल टोन्ड / डाएट दूध (Mother Dairy Live Lite / Amul Slim n Trim) | ₹२५ – ₹२६ | ₹५० – ₹५२ |
| म्हशीचे दूध(Buffalo Milk – A2/Special) | ₹३८ – ₹४० | ₹७५ – ₹८० |
| टोकन दूध (Mother Dairy Token / Bulk Vended) | — | ₹५४ |