
सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! ( सौजन्य - सोशल मीडिया )
कंज्यूमर फूड प्राइस इंडेक्स CFPI याद्वारे मोजली गेलेली महागाई आकडे 7.74% इतकी होती. इतर परिस्थितीमुळे वाढलेल्या अन्नधान्याच्या किंमतींनी एकूण महागाईवरचा दबाव कायम ठेवला. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये महागाईचा दबाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ग्रामीण भागातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 6.08% पर्यंत वाढली, तर शहरी भागांमधील महागाई 4.88 % इतकी होती. पण ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये अन्नधान्य महागाईचा दर अनुक्रमे 8.06% आणि 7.18 % इतका होता.
ऑगस्टमध्ये २.६१% असलेली हाऊसिंग महागाई वाढून २.७४% झाली. तर कपडे आणि इतर वस्तूंची महागाई देखील मागील महिन्यातील ३.५६% च्या तुलनेत वाढून ती ३.९३% पर्यंत पोहोचली. ही नवीनतम आकडेवारी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे, ज्याचे आधारभूत वर्ष २०२४ आहे. ही आकडेवारी प्राथमिक असून ती ग्रामीण आणि शहरी दोन्ही बाजारांमधील किमतींमधील बदल दर्शवते.
MoSPI ने सांगितल्यानुसार, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १,४०७ शहरी बाजारपेठा यामध्ये ऑनलाइन बाजारपेठांचा देखील समावेश आहे. त्यासोबत १,४६५ गावांमधून किमतींची माहिती गोळा करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात ग्रामीण आणि शहरी दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रतिसाद दर १००% इतका होता. ऑक्टोबर २०२६ साठीची ग्राहक किंमत निर्देशांक CPI महागाईची आकडेवारी १२ नोव्हेंबर रोजी, किंवा त्या दिवशी सुट्टी आली तर पुढच्या कामकाजाच्या दिवशी प्रसिद्ध करणार आहेत.