Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Minimum Balance: संसदेत मोठा खुलासा! मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने बँकांनी वसूल केले हजारो कोटी; ‘या’ बँकांची सर्वाधिक कमाई

Minimum Balance : बचत आणि चालू खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक न राखल्याबद्दल देशातील बँकांनी ग्राहकांकडून हजारो कोटी रुपयांची प्रचंड वसुली केल्याची माहिती संसदेत समोर आली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये खाजगी क्षेत्रातील बँका आघाडीवर असून एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेने सर्वाधिक दंड वसूल केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने कारवाई
  • बँकांनी वसूल केले हजारो कोटी
  • ‘या’ बँकांची सर्वाधिक कमाई
Minimum Balance : जर तुम्हीदेखील दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात निश्चित अशी ठराविक रक्कम शिल्लक (Minimum Balance) ठेवत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. नुकताच सरकारने संसदेत मोठा खुलासा केला आहे. यावरुन बँकांना किती नफा कमवला आहे याचा उलगडा होतो. सरकारने संसदेत स्पष्ट केलं की, २०२५-२६ या आर्थिक वर्षात सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून तब्बल ७,०८७ कोटी रुपयांपेक्षा जास्त शुल्क वसूल केले आहे. कोणत्या बँकने सगळ्याच जास्त वसूली केली आहे. तुमचं या बँकेत अकाऊंट आहे का? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Paytm ITR Offer: अवघ्या 11 रुपयात करा ITR दाखल! पेटीएमची भन्नाट ऑफर; शिल्लक राहिले फक्त 4 दिवस

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी हे स्पष्ट केलं की, जे ग्राहक त्यांच्या बचत किंवा चालू खात्यांमध्ये निश्चित सरासरी शिल्लक ठेवत नाहीत, त्यांच्याकडून बँकेच्या नियमांनुसार हे शुल्क आकारण्यात आले आहे.

कोणी किती रक्कम केली वसूल?

सरकारी आकडेवारीनुसार, खाजगी बँकांनी ₹४,९४८.७१ कोटी तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ₹२,१३७.९२ कोटी वसूल केले आहेत. म्हणजेच एकत्रितपणे ग्राहकांकडून ₹७,०८६ कोटींहून अधिक रक्कम आकारण्यात आली आहे. ही रक्कम केवळ किमान शिल्लक रकमेची अट पूर्ण न केल्यामुळे वसूल करण्यात आली आहे. हा आकडा बराच मोठा आहे.
अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकांच्या खात्यांवर किमान शिल्लक रकमेची अट लागू आहे, त्यांना एक निश्चित शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक असते, अन्यथा त्यांना दरमहा अतिरिक्त शुल्क लागू शकते.

कोणती बँक सगळ्यात पुढे ?

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, खाजगी बँकांमध्ये HDFC बँकेने सर्वाधिक ₹१,७९८.१४ कोटी जमा केले आहेत. त्यापाठोपाठ ॲक्सिस बँकेने ₹१,०८१.३३ कोटींचे एकूण शुल्क जमा केले आहे. या दोन बँकांचा मिळून १९ खाजगी क्षेत्रातील बँकांनी जमा केलेल्या एकूण शुल्कामध्ये अंदाजे ५८% वाटा आहे. यावरून हे स्पष्ट होते की, बँकांनी किमान शिल्लक शुल्काच्या माध्यमातून लक्षणीय रक्कम जमा केली आहे.
पण सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, शून्य-शिल्लक बचत खात्यांवर आणि प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांवर किमान शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. म्हणजेच जन धन खातेधारक आणि मूलभूत बचत खाती असलेल्या ग्राहकांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक स्थिती मजबूत

दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात, सरकारने सांगितले की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक स्थिती पूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या मजबूत झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे, एकूण अनुत्पादक मालमत्ता कमी झाली आहे आणि विविध व्यवसायांना दिले जाणारे कर्ज सातत्याने वाढत आहे. व्यवसायांना मोठा दिलासा देण्यासाठी, सरकारने गरजू व्यवसायांना आर्थिक मदत देण्यासाठी मे २०२६ मध्ये Emergency Credit Line Guarantee Scheme 5.0  नावाची एक विशेष योजना सुरू केली.

Govt Action Mode: 1ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर! साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय, व्यापाऱ्यांवर कडक नजर

Web Title: Minimum balance bank collected crore penalties parliamennt marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • axis bank
  • Bank
  • Business News
  • HDFC
  • HDFC Bank
  • HDFC Life
  • investment
  • Marathi News

संबंधित बातम्या

EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?
1

EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?

UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension
2

UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!
3

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!
4

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.