'या' शहरात उभारला जाणार भारतातील सर्वात मोठा मॉल; तब्बल 3000 जणांना मिळणार नोकरी!
युएईचा लुलु ग्रुप भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल उभारणार आहे. एएनआय याबाबत दिलेल्या वृत्तांनुसार, लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ अली भारतातील सर्वात मोठ्या मॉलच्या बांधकामाबाबत खूपच उत्साहित आहेत. भारतातील गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, आपल्या स्थानिक सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देताना मला खूप आनंद होत आहे. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून या संदर्भात पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
चालू वर्षापासून होणार बांधकाम सुरु
चालू वर्षापासून या लुलु ग्रुपच्या भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मॉलचे बांधकाम सुरू होणार आहे. याशिवाय लुलु ग्रुपचा देखील हा आतापर्यंतच्या सर्वात मोठा मॉल असणार आहे. असेही लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ अली यांनी सांगितले आहे. दरम्यान, लुलू ग्रुपमध्ये एकूण 65,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांचा व्यवसाय 42 देशांमध्ये पसरलेला आहे. समूहाची उलाढाल सुमारे 8 अब्ज डॉलर इतकी आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
स्थानिक 3,000 मुला-मुलींना रोजगार मिळणार
लुलु ग्रुपच्या भारतातील या सर्वात मोठ्या मॉलच्या बांधकामामुळे, भारतातील स्थानिक 3,000 मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे. अशा स्थितीत आपल्या स्थानिक सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने आपल्याला आनंद होत आहे. असेही लुलू ग्रुप इंटरनॅशनलचे सीएमडी एमए युसूफ यांनी म्हटले आहे.
‘या’ शहरांमध्ये आहेत लुलू ग्रुपचे मॉल
दरम्यान, युएईच्या लुलु ग्रुपचे देशातील अनेक शहरांमध्ये मॉल्स आहेत. यामध्ये बेंगळुरू, कोईम्बतूर, हैदराबाद, कोची, लखनऊ आणि तिरुवनंतपुरम या शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका मुलाखतीदरम्यान लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ यांनी माहिती दिली होती की, ते अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये देशातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल बनवणार आहेत. त्यानंतर आता त्यांनी आता पुन्हा एकदा लुलु ग्रुपचा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल चालू वर्षीपासून उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.