
महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
अहवालानुसार, मुंबईतील प्रतिसादकर्त्यांचे सरासरी मासिक घरगुती उत्पन्न ३७ हजार रुपये, तर सरासरी मासिक खर्च २३ हजार रुपये आहे. घरगुती खर्चामध्ये मुंबईकरांचे योगदान सुमारे ६८ टक्के आहे. विशेष म्हणजे, मासिक खर्च भागवल्यानंतर ४९ टक्के प्रतिसादकर्ते बचत करण्यास सक्षम असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मुंबईतील बचतीत १० टक्के गुणांची, तर गुंतवणुकीत तब्बल २८ टक्के गुणांची वाढ झाली आहे. यावरून मुंबईत राहणीमानाचा खर्च मोठा असला तरी नागरिक आर्थिक नियोजन, बचत आणि गुंतवणुकीकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसून येते.
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
मुंबईकरांच्या अत्यावश्यक मासिक खर्चात किराणा सामानाचा सर्वाधिक २५ टक्के वाटा आहे. त्यानंतर घरभाड्यासाठी २४ टक्के, प्रवासासाठी १६ टक्के आणि मुलांच्या शिक्षणासाठी १५ टक्के खर्च केला जातो. याशिवाय वैद्यकीय खर्चासाठी ८ टक्के, युटिलिटी बिलांसाठी ६ टक्के, स्वयंपाकाच्या गॅससाठी ४ टक्के आणि मोबाइल बिलांसाठी ३ टक्के खर्च होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
अत्यावश्यक खर्चासोबतच जीवनशैलीशी संबंधित खर्चातही मुंबई आघाडीवर असल्याचे अभ्यासातून दिसते. फॅशन खरेदीवर ३४ टक्के खर्च होत असून, त्यानंतर शहराबाहेरील प्रवासासाठी २७ टक्के आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी २४ टक्के खर्च केला जातो. होम अप्लायन्सेसवर १० टक्के, तर होम डेकोरसाठी ४ टक्के खर्च केला जातो.
भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांबाबत मुंबईकरांनी स्वतःचे घर खरेदी करणे याला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. तब्बल ३३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी घरखरेदी हे प्रमुख आर्थिक लक्ष्य असल्याचे सांगितले. त्यानंतर व्यवसाय सुरू करण्याला २९ टक्के, मुलांच्या शिक्षणासाठी बचतीला १५ टक्के, कर्जाची परतफेड करण्याला ११ टक्के आणि कार खरेदीला ९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी प्राधान्य दिले.
ही आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आकर्षक व्याजदर आणि स्थिर परतफेड कालावधी असलेल्या कर्ज सुविधेला २३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी प्राथमिक आर्थिक आधार मानले आहे. यानंतर मुदत ठेव किंवा एफडी ९ टक्के, जीवन विमा ६ टक्के, सोन्यातील गुंतवणूक ६ टक्के, म्युच्युअल फंड किंवा एसआयपी ५ टक्के आणि आरोग्य विमा ५ टक्के असा क्रम आहे.
जीएसटीशी संबंधित बदलांबाबत जागरूकता मध्यम असली तरी ७३ टक्के प्रतिसादकर्त्यांना जीएसटीमधील बदलांमुळे कुटुंबाच्या कल्याणासाठी होणाऱ्या खर्चात सुधारणा झाल्याचे वाटते. जीएसटीमुळे सर्वाधिक बचत दुचाकी वाहनांच्या खरेदीवर ३३ टक्के झाल्याचे ग्राहकांनी सांगितले. त्यानंतर स्मार्टफोनवर २९ टक्के आणि होम अप्लायन्सेसवर २८ टक्के बचत झाल्याचे नमूद करण्यात आले. जीएसटी २.० नंतर १३ टक्के प्रतिसादकर्ते चांगल्या दर्जाच्या अन्नावर अधिक खर्च करत आहेत, तर ४ टक्के नागरिक आरोग्यावर अधिक खर्च करत असल्याचे अभ्यासात आढळले.
मुंबईकरांमध्ये डिजिटल आर्थिक साधनांवरील विश्वासही मजबूत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. ५४ टक्के प्रतिसादकर्त्यांना अचानक उद्भवणारे खर्च हाताळणे आता तुलनेने सोपे वाटते. हे नागरिकांची आर्थिक तयारी आणि आत्मविश्वास वाढल्याचे संकेत मानले जात आहेत.
‘द ग्रेट इंडियन वॉलेट ४.०’ हा अभ्यास देशातील १७ प्रमुख शहरांमध्ये करण्यात आला. यामध्ये १८ ते ५५ वर्षे वयोगटातील कर्जदार, विविध उत्पन्न गट आणि विविध व्यवसायांमधील व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. एकूणच, अहवालातून मुंबईकरांच्या आर्थिक व्यवहारात खर्चासोबत बचत, गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीला वाढते महत्त्व मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. उच्च राहणीमान खर्च असतानाही घरखरेदी, व्यवसाय विस्तार आणि आर्थिक सुरक्षितता ही मुंबईकरांच्या आर्थिक निर्णयांची प्रमुख केंद्रे बनत असल्याचे या अभ्यासातून दिसून येते.
Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच