मुंबई/बेंगळुरू : उत्कृष्ट दागिन्यांसाठी प्रमुख ठिकाणांपैकी एक, ब्लूस्टोनने (BlueStone) २०१८ मध्ये नवी दिल्लीतील (New Delhi) पॅसिफिक मॉलमध्ये (Pacific Mall) आपले पहिले स्टोअर उघडले. कंपनीने पश्चिम बंगालमधील सिलीगुडी (Siliguri in West Bengal) येथील सिटी सेंटरमध्ये (City Center) आपले १०० वे स्टोअर उघडल्याचे जाहीर केले आहे. संपूर्ण भारतामध्ये, कंपनी आता प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि नवी दिल्ली मधील ३८ शहरांमध्ये उपस्थित आहे.
या प्रसंगी आणि गाठलेल्या महत्वाच्या टप्प्यावर, गौरव सिंग कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले. “आम्ही २०११ मध्ये आमच्या स्थापनेपासून आमच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदार – एक्सेल, सामा तसेच कलारी, आयवीकॅप, ड्रॅगोनेर, आर बी इन्वेस्ट्मेन्ट्स, आयर्न पिलर सारख्या इतर गुंतवणूकदारांच्या भक्कम पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळेखूप लांब पल्ला गाठला आहे. आमचे १०० वे स्टोअर उघडणे हा आमच्यासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. ब्लूस्टोन भूतकाळात आणि आता आणि तंत्रज्ञान-निर्देशित दृष्टिकोनाचे पालन करत आहे ज्यामुळे ग्राहकांच्या बदलत्या आवडी आणि अपेक्षा पूर्ण करण्यात आम्हाला मदत झाली आहे. आम्ही कदाचित डिजिटल-प्रथम ब्रँड म्हणून सुरुवात केली असेल पण ऑनलाइन अवकाशात आमच्या मजबूत अस्तित्वाला पाठिंबा देण्यासाठी आणि दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही आमच्या रिटेल स्टोअर्सचे नेटवर्क वाढवले आहे, जेणेकरून ग्राहकांना ब्रँड आणि त्याची उत्पादने अखंडपणे अनुभवता येतील. भौतिक स्टोअरचा दुसरा फायदा असा आहे की आम्ही स्थानिक ऑर्डरसाठी जलद वितरण समय देऊ शकतो आणि ते आमच्या “घरीच अजमावा” उपक्रमाला साहाय्य करते. २१-२२ या आर्थिक वर्षामध्ये आम्ही ३९ स्टोअर उघडले, जी एका आर्थिक वर्षात कंपनीने उघडलेल्या स्टोअरची सर्वाधिक संख्या होती. साथीच्या रोगामुळे, आम्ही नक्कीच कमी गर्दी अनुभवली परंतु कुठल्याही दुकानाचे शटर बंद झाले नाही. प्रत्यक्षात, गेल्या ४ महिन्यांत, आम्ही २४ नवीन स्टोअर्स उघडली आहेत आणि गेल्या २ महिन्यांत, आम्ही १७ नवीन स्टोअर उघडली आहेत. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की आमचे बहुतेक ग्राहक वेबसाइटवर त्यांचा प्रवास सुरू करतात आणि गेल्या ३ वर्षांत ही वर्दळ २६९% ने वाढली आहे.”
याव्यतिरिक्त असे म्हटले आहे की “आमच्या संचालनासाठी आवश्यक असलेली वेबसाइटच्या UI/UX पासून दागिन्यांच्या डिझाइन आणि उत्पादनापर्यंत बहुतांश कार्ये खुद्द आमच्याद्वारेच केली जातात. ७००+ लोकांची टीम अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, डिझाइन, उत्पादन, भांडार, उत्पादन विकास, विपणन, ग्राहकानुभव, किरकोळ विक्री, लॉजिस्टिक इत्यादी विविध कार्यांमध्ये कुशल आहे.”
त्यांच्या १०० व्या स्टोअरच्या घोषणेवर, हर्षना पसरी, मार्केटिंग प्रमुख म्हणाल्या, “वस्तू शोधणे आणि डिजिटल खरेदी हा आज सरासरी ग्राहकाचा उपजत स्वभाव बनत आहे परंतु प्रत्यक्ष पाहण्याचे पारंपारिक स्वरूप आणि ग्राहकांच्या किरकोळ संपर्क-स्थळांकडे दुर्लक्ष करणे ही चूक ठरेल. आम्ही अशा जगात वावरत आहोत जिथे संमिश्र मॉडेल हा व्यवसायाचा सर्वोत्तम दृष्टीकोन आहे आणि त्यामुळे कमी खर्चात अधिक कार्यक्षमता आणता येते. एकत्रितपणे, आम्ही आता १९,०००+ पिन कोडपर्यंत पोहोचलो आहोत. प्रामुख्याने तरुण आणि आधुनिक जोडप्यांना प्रभावित करणारे आमचे डिझाइन भांडार १०० संग्रहांमध्ये विस्तारित आहे आणि ८००० पेक्षा जास्त डिझाइन्स आम्हाला आमच्या स्पर्धकांपेक्षा वेगळे बनवतात. ब्रँड प्रत्येक तिमाहीत एकापेक्षा जास्त संकलन सादर करण्यात सातत्य राखत आहे आणि वाढते रद्दीकरण, ब्रँडची लवचिकता आणि नवीन ग्राहक आधार टिकवून ठेवण्याचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत. डिजिटल-फर्स्ट ब्रँड म्हणून सुरुवात करून, आम्ही डिजिटल चॅनेलवरसुद्धा चांगले आकर्षण आणि ब्रँड रिकॉल मिळवण्यात यशस्वी झालो आहोत.”






