Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM-SYM Scheme : भन्नाट योजना…! रोज 2 रुपयांपेक्षा कमी बचत करा, 60 वर्षांनंतर मिळवा दर महिना 3000 ची गॅरेंटी

PM-SYM Scheme : सर्वसामान्य माणसाची ही सर्वात मोठी चिंता दूर करण्यासाठी, मोदी सरकार 'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना' नावाची योजना राबवत आहे. या योजनेचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, तुम्हाला दरमहा फक्त ५५ रुपये वाचवायचे आहेत

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 05, 2026 | 01:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारची भन्नाट योजना…!
  • रोज 2 रुपयांपेक्षा कमी बचत करा
  • 60 वर्षांनंतर मिळवा दर महिना 3000
PM-SYM Scheme : प्रायव्हेट नोकरी करणारे, रोजंदारी मजूर तसंच किरकोळ कामं करणारे लोकं नेहमीच त्यांच्या भविष्याबाबत काळजीत असतात. जोपर्यंत शरीर साथ देतंय हात चालताहेत तोपर्यंत घर चालेल पण नंतर काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. शरीर काम करणं थांबवेल तेव्हा म्हातारपणी ते आपला खर्च कसा भागवतील. कारण त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तर पेन्शन मिळत नाही. मात्र हिच चिंता दूर करण्यासाठी सरकारने एक नवी योजना आणली आहे. या योजनेत तुम्ही रोज २ रुपयांपेक्षा कमी पैसे वाचवायचे आहेत. मग तुमच्या म्हातारपणाचा प्रश्नच सुटला. नेमकी काय आहे योजना? कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? सविस्तर जाणून घेऊयात. ( PM-SYM Scheme ) 

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम

सर्वसामान्य माणसाची सर्वात मोठी चिंता दूर करण्यासाठी, मोदी सरकार एक अद्भुत योजना आणली आहे. या योजनेचं नाव ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ (PM-SYM) असं आहे. योजनेचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला दरमहा फक्त ५५ रुपये म्हणजे दिवसाला २ रुपयांपेक्षा कमी रुपये वाचवायचे आहेत. मग तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षांनंतर ३००० रुपयांची हमी असलेली पेन्शन मिळेल.

काय आहे नेमकी PM SYM ?

ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी भारत सरकारची एक उत्कृष्ट पेन्शन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत, जर तुम्ही तुमच्या वयानुसार दरमहा थोडी थोडी रक्कम जमा केली, तर सरकार तुमच्या सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या ६० नंतर आयुष्यभर तुम्हाला दरमहा ₹३,००० म्हणजेच वार्षिक ₹३६,००० रुपयाची हमी पेन्शनची मिळणार.

सरकार पण भरतेय तितकीच रक्कम

या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, तुम्ही दरमहा जेवढी रक्कम जमा करता, तेवढीच रक्कम सरकार तुमच्या पेन्शन खात्यात जमा करते. याचा अर्थ असा की, जर तुमचा हप्ता ₹५५ असेल, तर सरकारदेखील दरमहा स्वतःच्या खिशातून ₹५५ तुमच्या खात्यात जमा करते.

कोणाला मिळू शकतो योजनेचा फायदा?

ही योजना विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तुमचे मासिक उत्पन्न ₹१५,००० किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाबतीत, तुम्ही असंघटित क्षेत्रातील असणे आवश्यक आहे. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, शिंपी, चांभार, धोबी किंवा घरगुती काम करणारे यांचा समावेश असू शकतो. तुम्ही EPFO, NPS किंवा ESIC सारख्या इतर कोणत्याही सरकारी पेन्शन/PF योजनेचे सदस्य असता नयेत आणि तुम्ही आयकर भरत नसावेत.

तुम्हाला किती पैसे जमा करावे लागतील?

तुमचा प्रीमियम योजनेत सामील होताना तुमच्या वयावर अवलंबून असतो.
१. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला दरमहा ₹५५ जमा करावे लागतील.
२. जर तुम्ही वयाच्या २९ व्या वर्षी गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला दरमहा ₹२०० गुंतवावे लागतील.

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी

Web Title: Pm sym scheme invest less than 2 rupees daily get 3000 monthly pension marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Government
  • Government Scheme
  • Pension

संबंधित बातम्या

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच
1

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.