सीआरपीएफच्या वाहनाला अपघात (फोटो- सोशल मीडिया )
सीआरपीएफच्या पथकाचे वाहन कालव्यात पडले
सातपेक्षा अधिक जवान जखमी झाल्याची माहिती
चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात झाला आहे. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील डगपोरामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. यामध्ये सीआरपीएफच्या वाहनाला अपघात झाला आहे. यामध्ये ७ जवान जखमी झाले आहेत. हा अपघात वाहनातील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचे समोर आले आहे.
श्रीनगरमधील डगपोरा येथील हा अपघात झाला. लष्कराचे वाहन थेट रस्त्यावरून घसरले आणि बाजूला असलेल्या कालव्यात जाऊन पडले. या घटनेत ७ पेक्षा अधिक सीआरपीएफचे जवान जखमी झाले आहेत. लष्कराचे वाहन हे वेगात असल्याचे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटना घडताच तेथील नगरिकांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले.
वाहनातील जखमी जवानांना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना लष्कराच्या रूग्णालयात हलविण्यात येणार आहे. जखमी जवानांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. गाडी कालव्यात पलटी झाल्याने शरीराच्या विविध भागात जखमा झाल्याच्या शक्यता आहे.
भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज
भविष्यात आशा घटना होऊ नयेत किंवा असे अपघात होऊ नयेत यासाठी भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ यांच्याकडून काळजी घेतली जाणार आहे. यासाठी काही मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाने देखील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप
भारतीय लष्कराच्या खरेदी धोरणात गेल्या पाच वर्षांत ऐतिहासिक बदल झाला असून, परकीय कंपन्यांवरील अवलंबित्व ३८ टक्क्यांवरून थेट १२ टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर लष्करी कंत्राटांमध्ये भारतीय खासगी उद्योगांचा वाटा ५ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ‘उसन्या’ तंत्रज्ञानावर विकसित राष्ट्र बनणे शक्य नसल्याची जाणीव ठेवून लष्कर आता स्वदेशी खासगी भागीदारीवर भर देत आहे, असे प्रतिपादन उप-लष्करप्रमुख (क्षमता विकास आणि शाश्वतता) लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी केले.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित ‘जय से विजय’ (संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष) या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या गेल्या पाच वर्षांतील खरेदीचा आढावा सादर केला. सिंह म्हणाले की, २०१९-२० या आर्थिक वर्षात भारतीय लष्कराने सुमारे ३७हजार कोटी रुपयांच्या कंत्राटांवर स्वाक्षरी केली होती. त्यावेळी परकीय कंपन्यांचा वाटा ३८ टक्के होता, तर खासगी उद्योगांचा वाटा केवळ ५ टक्के होता. मात्र २०२४-२५ या एकाच आर्थिक वर्षात लष्कराने ८४ हजार कोटींहून अधिक मूल्याची कंत्राटे केली असून, परकीय कंपन्यांचा वाटा घटून केवळ १२ टक्क्यांवर आला आहे.






