Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paytm युजर्ससाठी मोठा धक्का? RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकिंग परवाना कायमचा केला रद्द, नेमकं प्रकरण काय?

भारतीय बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 'पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड'वर (PPBL) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 25, 2026 | 12:59 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय बँकिंग क्षेत्रातून मोठी आणि खळबळजनक बातमी
  • पेटीएमवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
  • याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Paytm Payments Banks Licence Cancelled : भारतीय बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड’वर (PPBL) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार? जाणून घेऊयात सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा उसळी, चांदीचे भाव स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

1949 अंतर्गत हा परवाना रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करत त्यांचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत हा परवाना रद्द करण्यात आला असून, आता ही बँक भारतात बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. आरबीआयने आपल्या आदेशात या कारवाईमागील स्पष्ट कारणे नमूद केली आहेत. बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे ठेवीदारांच्या हितासाठी नुकसानकारक असल्याचे आरबीआयला आढळून आले. पेमेंट बँक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या अटींचे पालन करण्यात बँक वारंवार अपयशी ठरली.

कारवाईचे नेमके कारण काय?

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज हे ठेवीदार आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात चालले होते. वारंवार सूचना देऊनही बँकेच्या व्यवस्थापनाने अटी व शर्तींचे पालन केले नाही. बँकेचे चारित्र्य आणि कार्यपद्धती ठेवीदारांच्या हितासाठी घातक ठरत असल्याने हा परवाना रद्द करणे अनिवार्य असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. व्यवस्थापनावरील अविश्वास आणि वारंवार समोर येणाऱ्या तांत्रिक आणि वैधानिक त्रुटी हे या निर्णयामागचे मुख्य कारण आहे.

कायमस्वरूपी बंदचे आदेश

आरबीआयने 2022 मध्ये सुरुवातीला बँकेला नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर 2024 मध्ये खात्यांमध्ये नवीन ठेवी स्वीकारण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले, परंतु व्यवस्थापनावरील अविश्वास आणि वारंवार समोर येणाऱ्या तांत्रिक आणि वैधानिक त्रुटी पाहता आरबीआयने आता परवानाच रद्द करूनम दिले आहेत. आरबीआयने खात्री दिली आहे की, बँकेकडे तिच्या सर्व दायित्वांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. तसेच, मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी आरबीआय उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

हायकोर्टात जाण्याची तयारी

RBI ने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बँक पूर्णपणे बंद करण्यासाठी आम्ही हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत. याचा अर्थ येत्या काळात बँकेचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण केली जाईल, जेणेकरून सर्व नियमांचे पालन होईल.

शेअर बाजारावरही परिणाम

पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द केल्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. पेटीएमचे शेअर्स हलक्या घसरणीसह 1,153 रुपयांवर बंद झाले. जरी ही घसरण मोठी नसली तरी गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीला आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्राहकांचं पुढे काय?

आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता समोर प्रश्न उपस्थित राहत आहे की, ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील का? महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकरणांमध्ये RBI ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. आता ग्राहकांना अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याचा आणि घाबरण्याऐवजी योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे घाबरुन न जाता यासगळ्यावर ग्राहकांना शांतपणे निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

डिजिटल व्यवहारांतून आता दुप्पट बचत! PhonePe SBI कार्डचा धुमाकूळ; प्रत्येक ऑनलाइन खर्चावर मिळणार रिवॉर्ड्स

Web Title: Rbi cancels paytm payments bank license permanently see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Paytm
  • paytm app
  • Paytm IPO
  • RBI
  • RBI Action
  • RBI governor
  • RBI jobs
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

New Guidelines : बँकेची मनमानी आता नाही चालणार! खात्यातून पैसे कापण्यापूर्वी मिळणार Alert; RBI चा नवा नियम काय?
1

New Guidelines : बँकेची मनमानी आता नाही चालणार! खात्यातून पैसे कापण्यापूर्वी मिळणार Alert; RBI चा नवा नियम काय?

500 Rupee Note: एका 500 रुपयांच्या नोटेच्या छपाईसाठी किती खर्च येतो? ती कुठे छापली जाते? RBI ने उघड केले संपूर्ण सत्य…
2

500 Rupee Note: एका 500 रुपयांच्या नोटेच्या छपाईसाठी किती खर्च येतो? ती कुठे छापली जाते? RBI ने उघड केले संपूर्ण सत्य…

50000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? ‘हे’ काम नक्की करा नाहीतर Payment अडकणार; पाहा RBI चा नवीन नियम
3

50000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? ‘हे’ काम नक्की करा नाहीतर Payment अडकणार; पाहा RBI चा नवीन नियम

Akshaya Tritiya 2026: मात्र 1 रुपयामध्ये 24 कॅरेट Gold खरेदी करु शकता, काय करावं लागेल? जाणून घ्या सविस्तर
4

Akshaya Tritiya 2026: मात्र 1 रुपयामध्ये 24 कॅरेट Gold खरेदी करु शकता, काय करावं लागेल? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.