Womens Economic Empowerment: पेनीअरबायचा डिजिटल नारी उपक्रम, ग्रामीण भागामधील ५० हजार महिला उद्योजिकांचा सहभाग (फोटो-सोशल मिडिया)
Womens Economic Empowerment: लहान नगर व गावांमधील महिला भारताच्या विकासगाथेला नवीन स्वरूप देत आहेत. एकेकाळी फक्त घरकामांपुरते मर्यादित असलेल्या महिला आज त्यांच्या समुदायांसाठी डिजिटल व आर्थिक सेवांच्या महत्त्वपूर्ण सक्षमकर्त्या म्हणून उदयास येत आहेत. यासाठी महाराष्ट्र यादीमध्ये अव्वलस्थानी आहे, जेथे २२.६९ लाख महिला लखपती दीदी बनल्या आहेत आणि इतर महिलांना शाश्वत उदरनिर्वाह संधी देत आहेत. राज्यातील या प्रगतीला अधिक गती देत भारतातील आघाडीची शाखा नसलेले बँकिंग व डिजिटल नेटवर्क पेनीअरबाय (PayNearby)ने आपल्या डिजिटल नारी उपक्रमामध्ये पुढील ६ महिन्यांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील ५०,००० महिला उद्योजिकांना सामील करण्याचा संकल्प स्थापित केला आहे, तसेच त्यांना नवीन उत्पन्न संधी उपलब्ध करून देण्यात येतील.
हा उपक्रम ‘लखपती दीदी’ सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश महिलांना वार्षिक १ लाख रूपयांहून अधिक उत्पन्न मिळवण्यास आणि तळागाळापासून आर्थिक प्रमुख बनण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे. दीर्घकालीन स्वावलंबी, सामाजिक प्रभाव उपक्रम पेनीअरबाय आपल्या डिजिटल नारी उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक प्रभाव घडवून आणत आहे. प्रत्येक डिजिटल नारी किंवा ‘बँकर दीदी’ घरामधून ऑपरेट करते किंवा स्वत:च्या मालकीचे स्टोअर चालवते, ज्याद्वारे बँकिंग, पेमेंट्स, विमा, क्रेडिट, म्युच्युअल फंड्स अशा आणि बरेच सेवा देते.
त्यांनी केलेल्या प्रत्येक व्यवहारावर त्यांना कमिशन मिळते, ज्यामुळे स्थिर उत्पन्न स्रोत निर्माण झाले आहे. हे उद्योजकता मॉडेल महिलांना दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबीपणाची खात्री देते, तसेच हमी देते की त्यांच्या समुदायांना सतत आवश्यक सेवा उपलब्ध असतील, ज्यामुळे त्यांना वेळोवेळी मिळणाऱ्या सीएसआर निधींवर अवलंबून राहावे लागणार नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील गोदिंया जिल्ह्यामधील लहान गाव बागलबंधमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिला दुर्गा नाकतोडे, ज्या पेनीअरबाय डिजिटल नारी बनण्यासाठी या उपक्रमामध्ये सामील झाल्या.
गृहिणीवरून समुदाय प्रभावक बनत आज दुर्गा त्यांच्या गावामध्ये आवश्यक बँकिंग सेवा देतात, जसे खात्यामधून पैसे काढणे, पैसे हस्तांतर करणे, मोबाइल रिचार्ज करणे, बिल देयक भरणे. गावातील लोकांना या सेवांसाठी पूर्वी १२ किलोमीटर प्रवास जवळच्या आर्थिक संस्थेमध्ये जावे लागत होते, पण आता या सेवा सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्या २०० हून अधिक कुटुंबांना पाठिंबा देतात आणि दर महिन्याला ५ लाख रूपयांवरून अधिक व्यवहारांचे व्यवस्थापन करतात. बँकिंगसह त्या आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती देखील करतात आणि सॅनिटरी पॅड्सची विक्री करत मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याला प्रेरित करतात.
हेही वाचा: EPFO ने बदलले नियम, नोकरी बदलणे आणि न्यूनतम विम्यावर केले मोठे बदल; कर्मचाऱ्यांवर होणार थेट परिणाम
पेनीअरबायच्या सीएमओ आणि डिजिटल नारीच्या प्रोग्राम डायरेक्टर जयत्री दासगुप्ता म्हणाल्या, ”डिजिटल नारी मॉडेल सुरूवातीपासून स्वावलंबीपणासाठी डिझाइन करण्यात आले आहे. मॉडेल फिजिटल व मागणी-केंद्रित असल्यामुळे विकसित होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला आवश्यक, दैनंदिन सेवा देण्यास सक्षम होतात, ज्या कुटुंबांना वर्षभर आवश्यक असतात, ज्यामधून स्थिर उपस्थिती आणि सतत व्यवहारांची खात्री मिळते. या प्लॅटफॉर्मशी संलग्न असलेल्या डिजिटल नारी सहयोगाने वार्षिक व्यवहारांमध्ये १०,००० कोटी रूपयांचे व्यवहार करतात, तसेच ६० टक्क्यांहून अधिक पहिल्यांदा उद्योजिका बनलेल्या महिला दर महिन्याला सरासरी ३,५०० रूपये ते ५,००० रूपये उत्पन्न मिळवत आहेत, यामधून दीर्घकाळापर्यंत या मॉडेलची आर्थिक स्थिरता दिसून येते.”
पुढील तीन वर्षांमध्ये पेनीअरबायचा भारतभरातील किमान १ दशलक्ष महिलांना स्वयं-रोजगारासाठी सक्षम करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे त्या शाश्वत उत्पन्न निर्मितीसाठी आवश्यक असलेली साधने, सेवा व प्रशिक्षणांसह सुसज्ज होतील. या उपक्रमाच्या माध्यमातून पेनीअरबायचा १०० दशलक्षहून अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे, ज्यासह त्यांना या प्रबळ, महिला-नेतृत्वित नेटवर्कच्या माध्यमातून सहजपणे आर्थिक, डिजिटल व सामाजिक सेवा उपलब्ध होतील.






