श्री संत तुकाराम महाराजांची साधना आणि तपोभूमी असणाऱ्या देहू येथील भामचंद्र आणि भंडारा डोंगर 2011 ला शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलायं. मात्र शासनाच्या अधिसुचनेवर हरकती घेवून या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन सुरू असून सर्व पक्षीय नेत्यांच्या वरदहस्ताने संतभूमी डोंगर नष्ट करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूरात पत्रकार परिषदेत करण्यात आलायं..शिवाय सरकारने या ठिकाणचं अतिक्रमण हटवावं आणि राज्य सुरक्षित स्मारक अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांनी केली आहे..अन्यथा 10 मार्च रोजी आझाद मैदानावर वारकऱ्यांकडून शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलांय..