स्थानिक क्षमतांचा विस्तार करण्यासाठी शेफलर इंडिया ३ वर्षांत १,७०० कोटी रुपये गुंतवणार, तामिळनाडूत सुरू केले पाचवे उत्पादन केंद्र (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
शेफलर इंडिया लिमिटेडने २८ मे २०२५ रोजी तमिळनाडूतील शूलगिरी येथे त्यांच्या पाचव्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले , जे जर्मन मोशन टेक्नॉलॉजी कंपनीच्या भारतीय कामकाजाचा महत्त्वपूर्ण विस्तार आहे. वाढत्या ऑटोमोटिव्ह बाजाराच्या मागणी पूर्ण करण्यासाठी ही नवीन सुविधा पारंपारिक आणि हायब्रिड पॉवरट्रेन घटकांचे उत्पादन करेल.
आज दुपारी १:१५ वाजता एनएसईवर शेफलर इंडिया लिमिटेडचे शेअर्स ₹४,०२७.६० वर व्यवहार करत होते, जे ₹३३.५० किंवा ०.८४ टक्क्यांनी वाढले. १६,५०० चौरस मीटरचा हा फेज १ प्लांट, १०८,००० चौरस मीटर जमिनीच्या भूखंडात स्थित आहे, २०२५ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पूर्ण उत्पादन क्षमता गाठेल अशी अपेक्षा आहे. हा प्लांट प्रामुख्याने भारतीय बाजारपेठेसाठी प्लॅनेटरी गियर सिस्टम, हायब्रिड ट्रान्समिशन घटक आणि उदयोन्मुख ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल.
उद्घाटन समारंभाला शेफलर एजीचे पर्यवेक्षी मंडळाचे अध्यक्ष आणि कुटुंब भागधारक जॉर्ज एफ. डब्ल्यू शेफलर यांच्यासह कंपनीच्या जागतिक आणि भारतीय कामकाजातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेफलर इंडियाने त्यांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या वचनबद्धतेपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत त्यांनी १,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, जी मूळ नियोजित १,५०० कोटी रुपयांच्या तुलनेत जास्त आहे. या गुंतवणुकींमुळे पॉवरट्रेन सोल्यूशन्स, ई-मोबिलिटी तंत्रज्ञान आणि औद्योगिक बेअरिंग अनुप्रयोगांमध्ये विस्तार झाला आहे.
शूलगिरी सुविधेत पावसाच्या पाण्याचे संकलन, शून्य द्रव डिस्चार्ज प्रणाली, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे आणि १०० टक्के एलईडी लाइटिंग यासारख्या शाश्वत उत्पादन पद्धतींचा समावेश आहे. यामुळे शेफलर इंडियाच्या देशभरातील उत्पादन सुविधांची एकूण संख्या पाच झाली आहे, ज्यामध्ये तीन संशोधन आणि विकास केंद्रे आणि सात विक्री कार्यालये आहेत, जी कंपनीच्या “मेक इन इंडिया” धोरणाला पाठिंबा देतात.
शेफलर एजीच्या पॉवरट्रेन अँड चेसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथियास झिंक म्हणाले, “भारत शेफलरसाठी प्रमुख बाजारपेठ आहे. नवीन प्लांट आमची जागतिक उत्पादन उपस्थिती वाढवण्याच्या आणि प्रांतामधील स्थानिकीकरणाला अधिक चालना देण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा प्लांट आमच्या दीर्घकालीन विकास दृष्टिकोनाला पाठिंबा देतो आणि आम्हाला बाजारपेठेतील वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्यास, तसेच भारतातील बाजारपेठेसह विकसित होण्यास उत्तमरित्या सुसज्ज करतो.”
शेफलर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्ष कदम म्हणाले, “शूलगिरी येथे उद्घाटन करण्यात आलेल्या नवीन प्लांटमधून भारतातील आमच्या क्षमता आणि कौशल्ये वाढवण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे आम्ही ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची उत्तमरित्या पूर्तता करत आहोत. आमच्या उत्पादन सुविधांच्या विस्तारीकरणासह आम्ही विद्यमान स्थानिक बाजारपेठांच्या गरजांची, तसेच ई-मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना भावी गरजांची देखील पूर्तता करण्यास सुसज्ज आहोत. आम्ही देशाच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाप्रती कटिबद्ध आहोत, तसेच शाश्वत पद्धतींचा अवलंब करत आहोत. यामधून धोरणात्मक विकास स्रोत म्हणून भारतावरील शेफलर ग्रुपचा फोकस देखील दिसून येतो.”
शूलगिरी येथे उद्घाटन करण्यात आलेला प्लांट शेफलर इंडियाच्या देशातील चार उत्पादन प्लांट्स आणि तीन संशोधन व विकास केंद्रांमध्ये सामील झाला आहे. १,५०० कोटी रूपयांच्या सुरूवातीच्या कटिबद्धतेच्या तुलनेत शेफलर इंडियाने भारतातील आपली स्थानिक क्षमता वाढवण्यासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये (२०२२ ते २०२४) १,७०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये पॉवरट्रेन सोल्यूशन्स, ई-मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी, तसेच औद्योगिक उपयोजनांसाठी मोठ्या व मध्यम आकाराच्या बेअरिंग्जसाठी नवीन प्रॉडक्ट लाइन्सच्या विस्तारीकरणाचा समावेश आहे.
शेफलर इंडियाने २०२३ मध्ये बी२बी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म केआरएसव्ही इनोव्हेटिव्ह ऑटो सोल्यूशन्स प्रा. लि. (कूव्हर्स)च्या संपादनासह डिजिटल ऑटोमोटिव्ह ऑफ्टरमार्केट क्षेत्रात देखील आपली उपस्थिती दृढ केली.
श्री. हर्ष कदम पुढे म्हणाले, “वाढत असलेल्या गुंतागूंतीच्या वातावरणामध्ये उद्योग विकसित होत असताना आम्ही उदयोन्मुख संधींचा फायदा घेण्यासाठी आणि स्पर्धात्मक अग्रस्थान कायम राखण्यासाठी आमच्या सर्वसमावेशक मोशन टेक्नॉलॉजी पोर्टफोलिओच्या माध्यमातून भारतातील क्षमता प्रबळ करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”