मानसिक तणावात
बोनू ही मूळची विशाखापट्टणम येथील रहिवासी आहे. ती हैदराबाद येथे ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत होती. ती नेहमी यूट्यूबवर सक्रिय राहत होती. पोलिसांना मिळालेल्या तिच्या डायरीतून असं दिसून आलं की ती गेल्या 37 दिवसांपासून मानसिक तणावात होती. तिने आत्मत्या करण्या पूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवला होता. ते पोलिसांच्या हाती लागला आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मम्मीला भावनिक मॅसेज पाठवला होता.
सुसाईड नोटमध्ये काय?
सुसाईड नोटमध्ये पुढे तिने लिहिलं की, “मला माझ्या आयुष्यात पुढे जायला (मूव्ह ऑन व्हायला) भीती वाटते, कारण काय माहित तो परत येईल? मला माहित आहे की मी त्याला सोडून द्यायला हवं. तो माझा नाही आणि माझ्यासोबत तो राहण्याचा प्रयत्नही करत नसल्याचं मला माहित आहे. पण माझ्या मनातील एक छोटासा कोपरा अजूनही त्याची वाट पाहतोय, अजूनही आशा करतो, अजूनही कल्पना करतो की एक दिवस तो मलाच निवडेल. आणि म्हणूनच पुढे जाणं मला अशक्य वाटतंय, कारण काय माहित की, ज्या क्षणी मी खरोखर निघून जाईन, तो मागे वळून मला शोधेल?” असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
आपल्या आईला पाठवला भावनिक मॅसेज
बोनूची आई कामानिमित्त कुवेतमध्ये राहते. घटनेच्या दिवशी सकाळी तिने तिच्या आईला एक भावनिक मॅसेज पाठवला. या शेवटच्या मॅसेजमध्ये तिने लिहिलं की, “आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू स्वतःची आणि माझ्या धाकट्या भावाची काळजी घे.”
कशी उघडकीस आली घटना?
बोनुने आपल्या आईला मेसेज पाठवला होता. तो मेसेज वाचून तिच्या आईच्या मनात संशय निर्माण झाला. तिच्या आईने कुवेतहून बोनूला खूपदा फोन केले, पण तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने हैदराबादहून तिच्या एका मैत्रिणीला बोनूच्या घरी जायला सांगितलं.तिथे पोहोच्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी, तातडीने पोलिसांना फोन करून प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घराचा दरवाजा तोडल्यानंतर आत बोनूचा मृतदेह आढळला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय?
पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिस तिचा मोबाईल फोनचा डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया अकाउंटची तपासणी करत आहे. तसेच, तिच्या मित्रांची आणि नातेवाईकांची देखील चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोनू कोमालीने नुकतंच तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला तिच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलवलं असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.
Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत
Ans: हैदराबादच्या मणिकोंडा परिसरात तिच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली.
Ans: ब्रेकअपमुळे निर्माण झालेला मानसिक तणाव, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Ans: मोबाईल फोन डेटा, कॉल रेकॉर्ड्स, सोशल मीडिया अकाउंट आणि सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू आहे.






