Mutual Fund गुंतवणुकीचे नियम बदलले! ( सौजन्य - सोशल मीडिया )
आता म्युच्युअल फंड कंपन्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘डायरेक्ट प्लॅन’ हा डीफॉल्ट पर्याय म्हणून उपलब्ध केला जाईल. याता थेट अर्थ असा होतो की, आता जेव्हाही तुम्ही ॲप किंवा वेबसाइटवर गुंतवणूक करायला जाल, तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर डायरेक्ट प्लॅन दिसतील. त्याच वेळी, जर तुम्ही रेग्युलर प्लॅन निवडला, तर तो डायरेक्ट प्लॅनपेक्षा अधिक महाग आहे का यासंबंधित तुम्हाला थेट सांगण्यात येईल.
जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅन यापैकी एक निवडू शकता. डायरेक्ट प्लॅनमध्ये, तुम्ही थेट म्युच्युअल फंड कंपनीकडे गुंतवणूक करता. यामध्ये तुम्हाला कोणताही एजंट किंवा वितरकचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणतेही कमिशन द्यावे लागत नाही. तुमचे कमीशनचे पैसे वाचतात. रेग्युलर प्लॅनमध्ये, तुम्ही एजंट किंवा वितरकामार्फत गुंतवणूक करता. एजंटच्या कमिशनमुळे, त्याचा एक्सपेंस रेशो थोडा जास्त असतो.
एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या तुमच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी आकारत असलेली रक्कम किंवा चार्ज असतो. त्यामुळे, त्याचा तुमच्या फंडाच्या परताव्यावर थेट परिणाम होतो. डायरेक्ट प्लॅन निवडल्यास तुम्हाला गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात, तर रेग्युलर प्लॅनसाठी तुम्हाला एजंट किंवा वितरकाचा सल्ला घ्यावा लागतो. गुंतवणूकदारांना खर्चाच्या संपूर्ण तपशिलाची स्पष्ट माहिती मिळावी आणि ते माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील, हे सुनिश्चित करण्यासाठी सेबीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्याचा आता गुंतवणूकदारांना नेमका कसा फायदा होतो हे पाहावं लागेल.
( Desclaimer : बाजारातील परिस्थिती सतत बदलत असते, त्यामुळे कोणताही मोठा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
Ans: सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये 'डायरेक्ट प्लान' हा पर्याय डीफॉल्ट म्हणून लागू केला आहे.
Ans: डायरेक्ट प्लानमध्ये मध्यस्थ किंवा एजंटचे कमिशन द्यावे लागत नाही, त्यामुळे एक्सपेन्स रेशो कमी होतो आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.
Ans: गुंतवणूकदारांना नकळत जाणाऱ्या कमिशनची बचत होईल आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत त्यांचा नफा वाढण्यास मदत होईल.






