File Photo : Patanjali
सरकारी विमा कंपनी एलआयसीने (एलआयसी) बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पतंजली फूड्समधील आपला हिस्सा वाढवला आहे. एलआयसीने पतंजली फूड्सचे शेअर्स खुल्या बाजारात खरेदी केले आहे. या गुंतवणुकीनंतर एलआयसीचा पतंजली फूड्समधील एकूण हिस्सा 4.98 टक्क्यांवरून 5.02 टक्के झाला आहे.
इतक्या शेअर्सची खरेदी
एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की त्यांनी पतंजली फूड्सचे 1,25,000 शेअर्स खुला बाजारातून खरेदी केले आहेत. हे शेअर्स 1764.96 रुपये या दराने खरेदी करण्यात आले. आता एलआयसीकडे पतंजली फूड्सचे 1 काेटी 81 लाख 73 हजार 377 शेअर्स आहेत. म्हणजे पतंजली फूड्समध्ये एलआयसीचा हिस्सा आता 5.020 टक्के झाला आहे.
गुंतवणुकीची मोठी संधी! 29 नोव्हेंबरला खुला होणार ‘हा’ आयपीओ; वाचा … कितीये किंमत पट्टा!
पतंजलीचा निव्वळ नफा
पतंजली फूड्सचा निव्वळ नफा सप्टेंबर तिमाहीत 309 कोटी रुपये राहिला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 21.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 254.50 कोटी रुपये होता.
अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी, बड्या वकिलांकडून समर्थन अन् चित्र पालटले!
पतंजलीचा महसूल
पतंजली फूड्सचा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत महसूल 8154.20 कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 4.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत पतंजलीची एकूण कमाई 7821.90 कोटी रुपये होती.
मोठी बातमी! जुने पॅन कार्ड बंद होणार, वाचा… कसे बनवाल नव्याने तुमचे पॅन कार्ड!
शेअर्सचा परतावा
पतंजली फूड्सचे शेअर्स सोमवारी 0.32 टक्क्यांनी घसरून 1754.60 रुपयांवर बंद झाले. मंगळवारी पतंजली फूड्सचा शेअर्स वधारून 1,756.60 रुपयांवर व्यवहार करत आहे. एका महिन्यात शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एका वर्षात गुंतवणूकदारांना 31 टक्के परतावा मिळाला आहे. शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2030 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1170.10 रुपये आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)