आईचे दागिने विकले, 20 हजारातून उभा केली तब्बल 2,000 कोटींची कंपनी; वाचा...ही प्रेरणादायी यशोगाथा!
सध्याच्या घडीला अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये उतरत आहे. विशेष म्हणजे या तरुणांना आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर व्यवसायात मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका यशस्वी व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात आपल्या आईचे दागिने विकून २० हजार रुपये भांडवल उभारले होते. याच भांडवलाच्या जोरावर त्यांनी आज तब्बल २००० कोटींची उभी केली आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक तरुणांना मोठी प्रेरणा मिळत आहे.
14,000 पिन कोडवर कुरिअर सेवा देण्याची क्षमता
सुभाशीष चक्रवर्ती असे या व्यावसायिकाचे नाव असून, ते कोलकाता येथील मध्यमवर्गीय कुटूंबात जन्माला आले होते. १९९० मध्ये सुभाशीष यांनी केवळ २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून आपल्या डीटीडीसी (डेस्क टू डेस्क कुरिअर आणि कार्गो) कंपनीची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे त्यांनी हे भांडवल आपल्या आईचे दागिने विकून उभारले होते. मात्र, आज त्यांची ही कंपनी तब्बल २० हजार कोटींचा टर्नओव्हर करत आहे. त्यांच्या या कंपनीची देशभरातील जवळपास 14,000 पिन कोडवर कुरिअर सेवा देण्याची क्षमता आहे.
हेही वाचा – आता कर्ज मिळणे झाले सोपे… यूपीआयनंतर रिझर्व्ह बॅंक कर्जदारांसाठी आणतीये ‘ही’ सुविधा!
हळूहळू सर्व शहरांमध्ये केला कंपनीचा विस्तार
सुरुवातीच्या काळात बॅंकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना आईचे दागिने विकून भांडवल उभे करावे लागले. १९९० मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी देशभरातील सर्व शहरांमध्ये आपल्या कंपनीचा विस्तार करणे सुरू केले. १९९० च्या दशकात कुरिअर सेवा नवीनच असल्यामुळे त्यांना या व्यवसायात मोठे यश मिळाले. छोट्या शहरांमध्ये कुरिअर सेवेची वाढती मागणी पाहता, त्यांचा या क्षेत्रात कंपनी स्थापन करण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
किती आहे कंपनीची नेटवर्थ
डीटीडीसी कंपनीची आज देशभरातील जवळपास 14,000 पिन कोडवर कुरिअर सेवा देण्याची क्षमता आहे. याशिवाय जागतिक पातळीवर देखील कंपनीने आपले स्थान निर्माण केले आहे. ज्यामुळे विप्रो, इन्फोसिस आणि टाटा समुहासारख्या दिग्गज कंपन्या देखील डीटीडीसीच्या ग्राहक आहेत. कंपनीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी फ्रेंचायजीचा आधार घेतला. ज्याचा कंपनीला मोठा फायदा झाल्याचे सुभाशीष चक्रवर्ती सांगतात. उपलब्ध माहितीनुसार, सुभाशीष चक्रवर्ती यांची कंपनी सध्या २००० कोटींचा टर्नओव्हर करत आहे. जिद्द. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सुभाशीष चक्रवर्ती यांनी हे यश मिळवले आहे.