अभिनेत्री Kritika Kamra आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट Gaurav Kapur यांनी बुधवारी, ११ मार्च रोजी Mumbai येथे खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. अतिशय साध्या पद्धतीने आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर नवदाम्पत्याने बाहेर येऊन माध्यमांना आणि पापाराझींना अभिवादन केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कृतिका आणि गौरव दोघेही हसतमुखाने कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. कृतिकाने लाल रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती, ज्यामध्ये ती अत्यंत देखणी दिसत होती. तर गौरवने क्रीम रंगाची शेरवानी परिधान करून आपला लूक अधिक आकर्षक केला होता. दोघेही हातात हात घालून उभे राहत फोटोग्राफर्ससाठी पोझ देताना दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा लग्नसोहळा अतिशय साधेपणाने पार पडला. समारंभात फक्त छोटी पूजा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, कृतिका आणि गौरव यांनी अद्याप त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या लग्नाविषयी उत्सुकता वाढली आहे. कृतिका आणि गौरव यांच्या लग्नसमारंभाला अनेक बॉलिवूड कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री Soha Ali Khan, अभिनेता-दिग्दर्शक Farhan Akhtar, अभिनेत्री Anya Singh तसेच Malaika Arora यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. याशिवाय अभिनेत्री Neha Dhupia आणि तिचे पती Angad Bedi यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
फक्त चित्रपटसृष्टीतील कलाकारच नव्हे, तर क्रिकेट विश्वातील काही माजी खेळाडूही या लग्नसमारंभाला उपस्थित होते. भारताचा माजी क्रिकेटपटू Yuvraj Singh, Ajit Agarkar, Ashish Nehra आणि Zaheer Khan यांनी त्यांच्या पत्नींसह या सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
गौरव कपूर कोण आहेत?
Gaurav Kapur हे भारतातील प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट, क्रिकेट प्रेझेंटर आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म एप्रिल १९८१ मध्ये New Delhi येथे झाला. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी रेडिओ जॉकी म्हणून काम केले. त्यानंतर ते व्हिडिओ जॉकी (VJ) म्हणून Channel V वर लोकप्रिय झाले. यानंतर गौरव यांनी अभिनय क्षेत्रातही हात आजमावला. त्यांनी Darna Mana Hai, Ssshhh… आणि Ram Gopal Varma Ki Aag या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र, पुढे त्यांनी क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याकडे अधिक लक्ष दिले.
ते Extraaa Innings T20 आणि Cricbuzz Live सारख्या लोकप्रिय क्रिकेट शोचे सूत्रसंचालन करताना दिसले. याशिवाय त्यांनी स्वतःचा यूट्यूब शो Breakfast with Champions सुरू केला, ज्यामध्ये ते नामांकित खेळाडूंच्या मुलाखती घेतात. या शोमध्ये त्यांनी Virat Kohli, Rohit Sharma आणि Sachin Tendulkar यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंशी संवाद साधला आहे. दरम्यान, गौरव कपूर यांचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांनी अभिनेत्री Kirat Bhattal हिच्याशी विवाह केला होता. २०१२ मध्ये त्यांची पहिली भेट झाली आणि काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये लग्न केले. मात्र, २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता कृतिका आणि गौरव यांच्या लग्नामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सोशल मीडियावर नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






