शेतकऱ्याच्या मुलाने उभारली कंपनी; ...करतोय जपान, अमेरिकेला रेफ्रीजरेटर, एअर कंडीनरचा पुरवठा!
सध्याच्या घडीला अनेक जण व्यवसायामध्ये उतरत आहे. आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अनेक जण व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर, व्यवसायामध्ये येणाऱ्या अनेक जणांना व्यवसायात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी रेफ्रीजरेटर आणि एअर कंडीनर तयार करणाऱ्या कंंपनीची स्थापना करत मोठी प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे त्यांची कंपनी आज जपानी आणि अमेरिकेत देखील आपली उत्पादने निर्यात करत आहे.
नोकरीला ठोकला रामराम
संतोष कुमार यादव असे या व्यावसायिकाचे नाव असून, ते राजस्थानसधील तिजारा या छोट्याशा गावचे रहिवासी आहेत. ते शेतकरी कुटुंबातून असून, त्यांनी मॅकेनिकल इंजीनियरिंगपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी एका कंपनीत काही काळ नोकरी देखील केली. माञ, नोकरीत मन रमत नसल्याने, त्यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये लॉयड इलेक्ट्रिक अॅन्ड इंजीनियरिंग लिमिटेड या कंपनीमध्ये संतोष यांनी नोकरी सुरू केली होती. 2013 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकत, व्यवसायात पाउल ठेवले.
हेही वाचा – येत्या आठवड्यात खुला होणार ‘हा’ आयपीओ, पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!
देशविदेशात पुरवतायेत आपली उत्पादने
विशेष म्हणजे त्यांनी रेफ्रीजरेटर आणि एअर कंडीनर निर्मिती करण्याच्या व्यवसायात पाउल ठेवले त्यावेळी त्यांना इतके यश मिळेल, असे वाटले नव्हते. माञ, ते सध्या डायकिन, स्नायडर, किर्लोस्कर आणि ब्लू स्टार सारख्या कंपन्यांना आपली उत्पादने पुरवत आहेत. याशिवाय अमेरिका आणि कॅनडासह जगातील नऊ देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात देखील करत आहे. यामध्ये त्यांनी देशविदेशात होणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती घेऊन, आपली उत्पादने जागतिक बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मोठे यश मिळाले असल्याचे ते सांगतात.
लवकरच कंपनीचा आयपीओ खुला होणार
विशेष म्हणजे संतोष कुमार यादव यांच्या कंपनीचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आता कंपनीने शेअर बाजारात आपला आयपीओ लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला आपला आणखी एक प्लांट उभारायचा आहे. त्यासाठी कंपनीला सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्वोच्च संस्थेकडून आयपीओ लॉंच करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात संतोष कुमार यांच्या लॉयड इलेक्ट्रिक अॅन्ड इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ बाजारात येणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी जवळपास 250 कोटी रुपये उभारणार आहे.