अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार क्लीन चीट दिल्यावरुन टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत पार्थ पवार यांना क्नीट चीट मिळाल्यावरुन आक्षेप घेतला आहे. पार्थ पवारांवर अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला. दमानिया म्हणाल्या की, “कोणताही अधिकृत अहवाल अद्याप बाहेर आलेला नसताना बातम्या कशा काय छापून येत आहेत? खारगे समितीला असा निकाल देण्याचा किंवा क्लीनचीट देण्याचा कोणताही अधिकार नाही. ही बातमी त्यांच्याच गटाकडून किंवा राजकारण्यांनी युतीचा भाग म्हणून माध्यमांमध्ये पेरली आहे,” असे अंजली दमानिया म्हणाले. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई असल्यानेच ही प्रतिमा सुधारण्याची मोहीम राबवली जात असल्याचेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
हे देखील वाचा : अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा
अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. या विमानाच्या ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका बसला आहे. यामधून रेकॉर्डिंग गेले असल्याचा दावा केला जात आहे. ही. ब्लॅक बॉक्समधील माहिती का रिकव्हर होत नाही? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांच्या निधनानंतर ज्या प्रकारची घाई केली जात आहे. त्यावरून समाजात मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. माझ्या मते भाजपची बी टीम उरलेले सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी हे सर्व घडवून आणले आहे. त्यांना आता पक्षाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घ्यायची आहेत,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.
हे देखील वाचा : “हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये एका लिपीकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याबाबत दमानिया म्हणाल्या की, “मंत्रालयात आज प्रत्येक कामाला रेट कार्ड आहे. ही लोकं कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून पैसे घेतात, याची चौकशी व्हायला हवी. सुनेत्रा पवार जर झिरवाळ यांच्यावर नाराज आहेत, तर त्या पार्थवर का नाहीत? तो मुलगा आहे म्हणून त्याला सोडून दिले जाते का? मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मेसेज करून या प्रकरणाच्या अहवालाची PDF मागितली आहे. जोपर्यंत अधिकृत अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत बातम्या देणे चुकीचे आहे. राजकीय दबावाखाली अहवाल बाहेर येऊ दिले जात नाहीत,” जसे एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात घडले होते, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.






