'या' मोठ्या कंपन्यांना ३.०९ लाख कोटी रुपयांचा तोटा, टीसीएसला सर्वात जास्त नुकसान (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Share Market Marathi News: गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील घसरणीमुळे, सेन्सेक्सच्या टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन एकूण ३.०९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले आहे.
गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स २,११२.९६ अंकांनी (२.८०%) घसरला, तर एनएसई निफ्टी ६७१.२ अंकांनी (२.९४%) घसरला. आतापर्यंत फेब्रुवारीमध्येच निफ्टी १,३८३.७ अंकांनी (५.८८%) आणि सेन्सेक्स ४,३०२.४७ अंकांनी (५.५५%) घसरला आहे.
आठवड्यात टीसीएसचे बाजारमूल्य १.०९ लाख कोटी रुपयांनी घसरून १२.६० लाख कोटी रुपयांवर आले, ज्यामुळे टॉप १० कंपन्यांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरले. आता एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
इन्फोसिस: ५२,६९७.९३ कोटी रुपयांनी घटून ७.०१ लाख कोटी रुपये झाला.
भारती एअरटेल: ३९,२३०.१ कोटी रुपयांनी घटून ८.९४ लाख कोटी रुपये
रिलायन्स इंडस्ट्रीज: ३८,०२५.९७ कोटी रुपयांनी घटून १६.२३ लाख कोटी रुपये
एसबीआय: २९,७१८.९९ कोटी रुपयांनी घटून ६.१४ लाख कोटी रुपये झाले.
आयसीआयसीआय बँक: २०,७७५.७८ कोटी रुपयांनी घटून ८.४९ लाख कोटी रुपये झाली.
हिंदुस्तान युनिलिव्हर: ११,७००.९७ कोटी रुपयांनी घटून ५.१४ लाख कोटी रुपये झाला.
आयटीसी: ७,८८२.८६ कोटी रुपयांनी कमी होऊन ४.९३ लाख कोटी रुपये झाले.
या ट्रेंडच्या उलट, एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप ३०,२५८.४९ कोटी रुपयांनी वाढून १३,२४,४११.३१ कोटी रुपये झाले. बजाज फायनान्सचे मार्केट कॅप ९,०५०.२४ कोटी रुपयांनी वाढून ५.२९.५१६.९९ कोटी रुपये झाले. सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर राहिली. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.
बीजासन एक्स्प्लोटेकचे शेअर्स नवीन आठवड्यात ३ मार्च रोजी बीएसई एसएमई वर सूचीबद्ध होणार आहेत. यानंतर, न्यूक्लियस ऑफिस सोल्युशन्स ४ मार्च रोजी बीएसई एसएमई वर सूचीबद्ध होईल. श्रीनाथ पेपरचे शेअर्स ५ मार्च रोजी बीएसई एसएमई वर सूचीबद्ध होऊ शकतात. बालाजी फॉस्फेट्सचा आयपीओ ७ मार्च रोजी एनएसई एसएमई वर सूचीबद्ध होईल.